शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांच्या मदतीसाठी सरसावले पोलिस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:02 IST

अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे.

ठळक मुद्देपोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे. महिला उमेदवार राहण्यासाठी निवारा व जेवणासाठी खानावळी बाबत माहिती घेत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांना कळली. महिला उमेदवारांना रात्री राहण्याची व सकाळी लवकर फ्रेश होण्यासाठी पोलीस मुख्यालयातील दरबार हॉल व मुलींचे ब्यारेक उपलब्ध करून दिले.

अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे. गुरुवारी मैदानी चाचणीसाठी आलेल्या शेकडो महिला उमेदवारांना रात्रीच्या जेवनाची व राहण्याची सुवीधा नसल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तातडीने पोलिस मुख्यालयातील महिलांचा एक हॉल या उमेदवारांसाठी खुला करून दीला. यासोबतच त्यांच्या जेवनासह, आंघोळ व इतर सुवीधाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांनी उपलब्ध करून देत माणुसकीचा परिचय दिला.अकोला जिल्हा पोलीस दलात महिला पोलीस यांच्या 21 जागा भरल्या जाणार आहेत, याकरिता २२ मार्च रोजी महिला पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी बाहेरगावच्या उमेदवारांची मोठी संख्या आहे. बुधवारी सायंकाळीच या उमेदवारांनी पोलिस मुख्यालयाच्या जवळपास माहिती घेताना व विचारपूस करताना दिसून आल्या. महिला उमेदवार राहण्यासाठी निवारा व जेवणासाठी खानावळी बाबत माहिती घेत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांना कळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावला या महिला उमेदवारांची भेट घेउन भरतीसाठी आलेल्या मुलींना पोलीस मुख्यालय मध्ये बोलावून घेतले. त्यानंतर या महिला उमेदवारांना रात्री राहण्याची व सकाळी लवकर फ्रेश होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. पोलीस मुख्यालयातील दरबार हॉल व मुलींचे ब्यारेक उपलब्ध करून दिले. नाश्ता जेवणाची एकूण 200 मुलींची व्यवस्था केली. पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी मुलींच्या अडचणी जाणूण घेत त्यांना सुवीधा उपलब्ध करून दिल्याने या २०० वर उमेदवारांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

हळव्या मनाचे पोलिस अधीक्षकअकोला जिल्हयात गत तीन वर्षांपूर्वीपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या महिला उमेदवार मंदिरात किंवा जागा मिळेल तीथे रात्र काढत होत्या. त्यांची साधी विचारपुसही यापुर्वी अकोला पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. मात्र हळव्या मनाचे असलेले पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या २०० वर महिला उमेदवारांची अडचण समजताच थेट पोलिस मुख्यालय गाठले. त्यांना राहण्याची व जेवनाची सुवीधा उपलब्ध करून दिली. यावरुन पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हळव्या मनाचा परिचीती उमेदवारांसह उपस्थित पोलिस अधीक्षकारी व कर्मचाºयांना आली.

 

टॅग्स :Akolaअकोलाpolice parade groundपोलिस कवायत मैदानAkola Police Head Quarterअकोला पोलीस मुख्यालय