शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

 अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:59 IST

कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी झुंज देत असताना शेतीशी संबंधित सर्व विषय हाताळणाºया राज्याच्या कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यातच कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहेत. विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांना दिलासा देत मार्गदर्शन करण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना वाºयावर सोडण्याचा प्रकार घडला आहे.राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीनचा समावेश आहे. तसेच सोयाबीनच्या काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ४८ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रत्येक शेतकºयाच्या शेतात जाऊन पंचनामा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळून लागणारी आग, या आपत्तींमध्ये नुकसाग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांच्या काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास त्याचेही वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात. पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेत कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामविकास विभाग, महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांशी समन्वय ठेवून तातडीने काम करावे लागते. त्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेची प्रमुख व महत्त्वाची भूमिका आहे; मात्र ती जबाबदारी पार पाडण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकारी वाघ २६ आॅक्टोबरपासून ५ ते ६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर गेल्याची माहिती आहे. या काळात शेतकºयांनी कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न आता आपत्तीग्रस्तांना पडत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला