शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल:  कोट्यवधीच्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:08 IST

सिटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे, व्हेंटीलेटर यांसह इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली आहेत; मात्र तंत्रज्ञाअभावी रुग्णालय परिसरातच ते पडून आहेत.

ठळक मुद्देइमारतीचे बांधकाम सुरू असतानाच काही वैद्यकीय उपकरणेही येथे दाखल झाली. या वैद्यकीय उपकरणांच्या इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक तंत्रज्ञच उपलब्ध नाहीत. कोट्यवधीचे हे वैद्यकीय उपकरणे निर्माणाधीन इमारतीच्या परिसरातच ठेवण्यात आली आहेत.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. या रिक्त पदांमुळे रुग्णालयासाठी आलेल्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झालेले नाही. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाची घाई केली जात आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती.हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच काही वैद्यकीय उपकरणेही येथे दाखल झाली; मात्र या वैद्यकीय उपकरणांच्या इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक तंत्रज्ञच उपलब्ध नाहीत. परिणामी, कोट्यवधीचे हे वैद्यकीय उपकरणे निर्माणाधीन इमारतीच्या परिसरातच ठेवण्यात आली आहेत. चारही सुपर स्पेशालिटीची ही स्थिती असताना केंद्र सरकारकडून होत असलेल्या उद्घाटनाच्या घाईमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढविली आहे.केंद्राकडे पद मंजुरीची शिफारसपद मंजूर नसताना केंद्र सरकारकडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाबाबत पत्र पाठविण्यात आले; परंतु पदच नसताना हे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता उद््घाटनापूर्वी पद मंजुरी द्यावी, अशी शिफारस करणार असल्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिल्याची माहिती एकाच उच्चपदीय वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

या उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाहीसिटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे, व्हेंटीलेटर यांसह इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली आहेत; मात्र तंत्रज्ञाअभावी रुग्णालय परिसरातच ते पडून आहेत.

हे उपचार होणार शक्यया वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झाल्यास रुग्णांना कर्करोग, मूत्रपिंड, एंडोक्राइनोलॉजी, कार्डियोलॉजी, सीटीव्हीएस, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी आणि इतर रोगांवर तांत्रिक उपचार करणे शक्य होणार आहे, तसेच सुपर स्पेशालिटी ब्लॉक किंवा ट्रॉमा सेंटर आणि इतर आवश्यक सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य