शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रविवार विशेष : स्कूटरच्या इंजीनवर बनवले डवरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 15:46 IST

बोरगाव वैराळे: चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत धामणा येथील श्याम मुग्दल भांबेरे ...

ठळक मुद्देजुन्या स्कूटरच्या इंजीनचा वापर करून पेट्रोलवर चालणारे वखर व डवरे बनविले. एकर शेतीची वखरणी आणि डवरणी करण्यासाठी केवळ एक लीटर पेट्रोल लागते. बैलांची व एका माणसाच्या मजुरीचे म्हणजे जवळजवळ १ हजार रुपयांची बचत या यंत्रामुळे होणार आहे.

बोरगाव वैराळे: चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत धामणा येथील श्याम मुग्दल भांबेरे या अल्पभूधारक शेतकºयाने स्कूटरच्या इंजीनवर वखरणी करणाºया यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या माध्यमातून १०० रुपयात १ एकरावर डवरणी होत असल्याची माहिती भांबेरे यांनी दिली आहे.धामणा येथील अल्पभूधारक व अल्पशिक्षित शेतकरी श्याम मुग्दल भांबेरे हे गावात मागील पाच वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून वेल्डिंगचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी कुठल्याही प्रकारचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण न घेता हा व्यवसाय सुरू केला आहे. शेतीसाठी लागणारे बैलावर चालणारे वखर, डवरे, तिफण, बैलबंडी तसेच कूलर बनविण्याचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी हातभार लावत असतात. हे सर्व करत असताना त्यांनी यावर्षी शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा उद्देश ठेवून जुन्या स्कूटरच्या इंजीनचा वापर करून पेट्रोलवर चालणारे वखर व डवरे बनविले. हे इंजीन आणि पेट्रोलवर चालणाºया वखर व डवºयाला १ एकर शेतीची वखरणी आणि डवरणी करण्यासाठी केवळ एक लीटर पेट्रोल लागते. तसेच तासभरात हे आधुनिक अवजार तीन एकर शेतामध्ये पिकातील तण नष्ट करत असल्याचा दावा श्याम भांबेरे यांनी केला आहे. या यंत्रामुळे शेतकºयांचे पैसे आणि वेळही वाचणार आहे.वेळ आणि पैशांची बचततीन एकर शेतीची मशागत करण्यासाठी बैलांची व एका माणसाच्या मजुरीचे म्हणजे जवळजवळ १ हजार रुपयांची बचत या यंत्रामुळे होणार आहे. पहिल्या वेळी हे अवजार बनविण्यासाठी १० हजार रुपये खर्च येत असला तरी शेतीच्या पेरणीपासून डवरणी, वखरणी व पेरणीपूर्वी करण्यात येणाºया मशागतीच्या कामासाठी एकाच अवजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग करून उपयोगी पडत आहे. त्यामुळे कमी खर्चात व कमी वेळात जास्तीत जास्त काम होणार असल्यामुळे श्याम भांबेरे यांनी बनविलेले शेती उपयोगी अवजार शेतकºयासाठी फायद्याचे ठरणार आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी