शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीच्या मुहूर्तालाच ‘सुलतानी’ संकट!

By admin | Updated: August 30, 2016 01:35 IST

तेराही बाजार समित्यांमध्ये मुगाचे हमी भाव वा-यावर; शेतकरी हवालदिल.

गणेश मापारी खामगाव(जि. बुलडाणा), दि. २९: शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतानाच शेतकर्‍यांवरील अस्मानी व सुलतानी संकटेही वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर्षी खरिपाच्या मुगाला ५ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला असून, बुलडाणा जिल्ह्यातील तेराही बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दरानेच नवीन मुगाची खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सतत तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाने दिलासा दिला. जुलै महिन्यात खरिपांच्या पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता आता वाढली आहे. येत्या तीन ते चार दिवसात पावसाने दमदार हजेरी न लावल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. एकीकडे पाऊस न येण्याचे अस्मानी संकट शेतकर्‍यांवर आले असतानाच बाजार समित्यांमध्येही मूग खरेदीत कमी भाव मिळत असल्याच्या सुलतानी संकटाचा सामनाही शेतकर्‍यांना करावा लागत आहे. शासनाने यावर्षी मुगाला प्रति क्विंटल ४८00 रुपये तसेच ४२५ रुपये बोनस असा एकूण ५२२५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी केली जाऊ नये, यासाठी बाजार समित्यांना निर्देश देण्यात आले आहेत; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी एकाही बाजार समितीने हमी भावाचा मुहूर्त साधलेला नाही. चार हजार रुपयेपासून तर ४८00 रुपये प्रति क्विंटल या दरानेच मुगाची खरेदी करण्यात येत आहे. १0 ऑगस्ट नंतर बाजार समितीमध्ये नवीन मूग येण्यास सुरुवात झाली आहे. बुलडाणा बाजार समितीत ५१00 रुपये प्रति क्विंटल दराने मूग खरेदी करण्यात आला; मात्र दुसर्‍या दिवशीपासूनच मुगाचे भाव ४३00 ते ४८00 रुपयांपर्यंत आले आहे. इतर १२ बाजार समित्यांमध्ये मुगाने ५ हजाराचा भाव पाहिलाच नाही. एकंदरीतच मूग खरेदीमध्ये शेतकर्‍यांची सर्रास लूट होत असताना बाजार समित्याही ह्यमूगह्ण गिळून बसल्या आहेत.