शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील मालमत्ता कराच्या शास्तीवर ३१ जानेवारीपर्यंत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:30 IST

अकोला : शहरातील ज्या नागरिकांकडे २0१६-१७ मधील मालमत्ता कर थकीत असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराची रक्कम जमा केल्यास त्यांना शास्तीच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केली जाणार आहे. 

ठळक मुद्देथकीत मालमत्ता करधारकांना मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील ज्या नागरिकांकडे २0१६-१७ मधील मालमत्ता कर थकीत असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराची रक्कम जमा केल्यास त्यांना शास्तीच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेत वाढ करण्यासाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. १९९८ पासून ते २0१६ उजाडेपर्यंत मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया ठप्प पडली होती. त्यामुळे प्रशासनाच्या दप्तरी ७२ हजार मालमत्तांची नोंद असली, तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न अवघे १६ ते १८ कोटी रुपये होते. प्रशासनाने ‘जीआयएस’द्वारे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर ३१ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच झाली नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते. नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ४ हजार २३0 मालमत्तांची नोंद झाली, तर नवीन प्रभागात सर्वेक्षण केले असता ४८ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. प्रशासनाने सुधारित दरानुसार कर आकारणी केल्यानंतर ६२ कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल करणे शक्य होणार आहे. अकोलेकरांना सुधारित करप्रणालीच्या नोटीस जारी केल्यानंतर नागरिकांनी कर जमा करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, २0१६-१७ या कालावधीत ज्या नागरिकांक डे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतीत नागरिकांनी थकीत मालमत्ता व पाणीपट्टी कर जमा केल्यास त्यांना शास्तीचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागणार नाही. त्यानंतर मात्र शास्तीची आकारणी लागू केली जाईल. 

‘जीआयएस’प्रणालीमुळे शहरातील एकूण मालमत्तांचा अचूक आकडा समोर आला आहे. सुधारित दर लागू केल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार असून, मनपासमोर ७२ कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट आहे. थकीत कर जमा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळेच शास्ती अभय योजनेला सुरुवात केली आहे. -जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका