शेगाव (जि. बुलडाणा): तरुण शेतकर्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नागझरी शिवारात ३१ मे रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अकोला जिल्ह्यातील नितेश जगन्नाथ फोकमारे (२४) या युवा शेतकर्याने रेल्वे स्थानकाजवळील नागझरी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कलम १७४ जाफौन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवा शेतकरी तेल्हारा तालुक्यातील थार येथील रहिवाशी आहे. याप्रकरणी तपास आरपीएफ उपाध्याय हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
तरुण शेतक-याची रेल्वेखाली आत्महत्या
By admin | Updated: June 1, 2016 01:17 IST