शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 14, 2017 01:10 IST

अकोट : आजाराला कंटाळून व मानसिक स्थिती ठीक नसल्याने ३८ वर्षीय स्मिता धनंजय मेतकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना १३ जुलै रोजी सकाळी ११ पूर्वी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : आजाराला कंटाळून व मानसिक स्थिती ठीक नसल्याने ३८ वर्षीय स्मिता धनंजय मेतकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना १३ जुलै रोजी सकाळी ११ पूर्वी घडली. पोलीस सूत्रानुसार, रुईखेड येथील धनंजय जगन्नाथ मेतकर हे मुलांच्या शिक्षणानिमित्त स्थानिक श्रीकृष्ण मुक्ताई संकुलमधील कुटुंबासह राहतात. १३ जुलै रोजी दोन्ही मुले शाळेत गेली होती, तर पती धनंजय मेतकर हे नगर परिषदेमध्ये कामाकरिता गेले होते. तेथून रुईखेड येथील शेतात जाण्यापूर्वी जेवणाचा डबा घेण्याकरिता घरी आले असता घराच्या दरवाजाची बेल वाजविली. दरवाजा न उघडल्याने त्यांनी स्वत:जवळील चावीने दरवाजा उघडला. आतमध्ये गेल्यानंतर बेडरूममध्ये पत्नी स्मिता हिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन खाली पडलेल्या स्थितीत आढळून आली. याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा व शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी धनंजय मेतकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.