दिग्रस बु. (पातूर, जि. अकोला) : पातूर तालुक्यातील हिंगणा उजाडे येथील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. श्रीधर महादेव उजाडे (३२) असे मृतकाचे नाव असून, ते वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवार दुपारपासून ते कुणासही आढळून न आल्यामुळे त्यांची शोधाशोध करण्यात आली. अखेर मंगळवारी पहाटे हिंगणा उजाडे शिवारातील त्यांच्या शेतातच त्यांचा मृतदेह झाडाला गळफास घे तलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून, गावात याबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. पातूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: October 8, 2014 00:36 IST