लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व राष्ट्रीय पॉवर लिफ्टिर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकमधील हौसपेठ येथे राष्ट्रीयस्तर बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मास्टर ग्रुपमध्ये ९0 कि लो वजन गटात अकोल्याचे सुधीर प्रधान यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करीत रौप्य पदकाचे मानकरी ठरले.याच स्पर्धेत अकोल्याचे राजेश चव्हाण यांनी ७५ किलो वजन गटात सिनिअर ग्रुपमध्ये तृतीय स्थानावर राहून कांस्य पदक मिळविले, तर ६७ किलो वजन गटात अक्षय प्रधानला चौथे स्थान प्राप्त झाले. सुधीर प्रधान हे गोल्डन जीमचे संचालक व प्रशिक्षक असून, महाबीज येथे कार्यरत आहेत. राजेश व अक्षय गोल्डन जीमचे खेळाडू असून, सुधीर प्रधान यांच्या मार्गदर्शनात सराव करतात. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, संचालक खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख यांनी सुधीर प्रधान यांचा गौरव केला.
अकोल्याचे सुधीर प्रधान यांना पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:36 IST
अकोला: कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व राष्ट्रीय पॉवर लिफ्टिर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकमधील हौसपेठ येथे राष्ट्रीयस्तर बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मास्टर ग्रुपमध्ये ९0 कि लो वजन गटात अकोल्याचे सुधीर प्रधान यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करीत रौप्य पदकाचे मानकरी ठरले.
अकोल्याचे सुधीर प्रधान यांना पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक!
ठळक मुद्देकर्नाटकमधील हौसपेठ येथे पार पडली राष्ट्रीयस्तरीय बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धा प्रधान यांनी ९0 कि लो वजन गटात द्वितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्य पदक मिळविले