शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

दात्यांच्या मदतीने ‘लक्ष्मी’वर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:57 IST

अकोला : पाणी भरताना विहिरीत पडलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबीयांवर गरिबीच्या परिस्थितीमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, उदारमतवादी दानदात्यांच्या मदतीने लक्ष्मीच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, उपचाराचा पूर्ण खर्च दात्यांनी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. गुरुवारी दुपारपासून दात्यांनी मदत द्यायला सुरुवात केल्याने लक्ष्मीचे वडील नारायण ठाकरे यांना गहीवरून आले होते.  

ठळक मुद्देलक्ष्मीच्या उपचारासाठी मदतीचा ओघ रमेशचंद्र चांडक यांनी दिले उपचार करण्याचे आश्‍वासनप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी भरताना विहिरीत पडलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबीयांवर गरिबीच्या परिस्थितीमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, उदारमतवादी दानदात्यांच्या मदतीने लक्ष्मीच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, उपचाराचा पूर्ण खर्च दात्यांनी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. गुरुवारी दुपारपासून दात्यांनी मदत द्यायला सुरुवात केल्याने लक्ष्मीचे वडील नारायण ठाकरे यांना गहीवरून आले होते.  वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील लक्ष्मी नारायण ठाकरे विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील सहारा हॉस्पिटलपमध्ये तिला भरती करण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी वणवण भटकंती करीत होते. याबाबत ‘लोकमत’ने ११ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत अकोला जिल्ह्यातील दाते मदतीला धावले. अकोला शहरातील गुरुकुल नगरामधील रहिवासी पूजा ईश्‍वरसिंह ठाकूर आणि धनश्री विलास देशमुख यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली. गुरुवारी दुपारी नारायण ठाकरे यांच्याकडे दहा हजार रुपये सुपूर्द करण्यात आले. विलास देशमुख यांनी पंकज साबळे यांच्याशी संपर्क करीत मुलीला मदत देण्याचा मानस बोलून दाखविला. त्यावर पंकज साबळे यांनी त्वरित रुग्णालयाशी संपर्क करीत भेट घडवून आणली. यावेळी साबळे यांच्यासोबत डॉ. संदीप चव्हाण व रोहण खरे उपस्थित होते. यासोबतच माहेश्‍वरी समाज संघटना अकोलाचे अध्यक्ष तथा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेशचंद्र शिवरतन चांडक, अँड. आशिष बाहेती व चंद्रशेखर रामभाऊ खेडकर यांनी लक्ष्मीच्या उपचाराचा पूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. गुरुवारी दुपारी लक्ष्मीच्या वडिलांना मदत सुपूर्द करीत उपचारासाठी व उपचारानंतर लागणारा सर्व खर्च देण्याचे अश्‍वासन दिले. 

दीड लाखांची शस्त्रक्रिया ४0 हजारांत - रुग्णालयाचा पुढाकार लक्ष्मीच्या डोक्याची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने दीड लाख रुपये खर्च होता. मात्र, लक्ष्मीच्या वडिलांकडे उपचारासाठी पैसे नव्हते. रुग्णालयात दाखल करण्याकरिताच गावकर्‍यांनी पैसे गोळा करून दिल्याचे लक्षात आल्यावर लक्ष्मीच्या शस्त्रक्रियेचा खर्च कमी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रियेसाठी लागणारा  खर्च दीड लाखाऐवजी केवळ ४0 हजार रुपये घेण्यात येणार असल्याचे सहारा रुग्णालयाचे संचालक प्रशांत वानखडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयwashimवाशिम