शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोविडग्रस्त १५० गर्भवतींची यशस्वी प्रसूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:58 IST

Akola News : १५० कोविडग्रस्त गर्भवतींची या ठिकाणी प्रसुती झाली असून, एकाही नवजात शिशुला कोविडची लागण झाली नाही.

अकोला : कोविडच्या इतर रुग्णांसोबतच गर्भवतींसाठीदेखील सर्वोपचार रुग्णालयातील प्रसुती केंद्र राखीव ठेवण्यात आले होते. मागील वर्षभरात सुमारे १५० कोविडग्रस्त गर्भवतींची या ठिकाणी प्रसुती झाली असून, एकाही नवजात शिशुला कोविडची लागण झाली नाही. वयोवृद्धांप्रमाणेच गर्भवतींनाही कोविडचा धोका असतो. त्यामुळे गर्भवतींची विशेष निगा राखणे आ‌वश्यक असून, एका गर्भवतीकडून इतर गर्भवतींना कोविडची लागण होऊ नये, या अनुषंगाने कोविडग्रस्त गर्भवतींसाठी सर्वोपचार रुग्णालयात खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कोविडच्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सर्वाेपचारमध्ये आतापर्यंत १५० गरोदर महिलांची प्रसुती करण्यात आली आहे. यातील सर्व माता आणि शिशू सुरक्षित असल्याची जीएमसी सुत्रांची माहिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचे स्वरूप बदलल्याने संसर्गाचा वेग आणि लक्षणांची तीव्रताही बदलली आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी कोविड बाधितांच्य‍ा संपर्कात येऊ नये. गरोदर काळात वैद्यकीय चाचण्यांसाठी महिलांना बाहेर पडावे लागते. अशावेळी गर्दीशी संपर्क येऊन कोविडची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालय परिसरात वावरताना गरोदर महिला आणि मातांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी

कोविडग्रस्त गर्भवतींच्या प्रसुतीदरम्यान नवजात शिशुला कोविडचा संसर्ग होऊ नये, यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. पीपीई किट परिधान करून प्रसुती करणे हे डॉक्टरांसोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही जिकरीचे काम आहे.

 

सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविडग्रस्त गर्भवतींची आतापर्यंत यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे. एकाही शिशुला कोविडची लागण झाली नसून, त्यांचे आराेग्य चांगले आहे. यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जाते.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकाेला

टॅग्स :Lady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालयAkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय