शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

सोयाबीन बियाण्यावरील अनुदान रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:27 IST

बियाण्यावर दरवर्षी देण्यात येणारे अनुदान शासनाने दिले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगाम १५ दिवसांवर आला असून, देशात मान्सून आगमनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; पण ज्यावर सर्व खरीप हंगाम अवलंबून असतो, त्या बियाण्यावर दरवर्षी देण्यात येणारे अनुदान शासनाने दिले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गतवर्षी जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे सोयाबीन पिकालाही जबर फटका बसला. या पिकातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही. या संकटाचा सामना शेतकरी करीत असताना कोरोनाचे महाकाय संकट देशावर आले. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात टाळेबंदी लावण्यात आली. याचा दुसरा फटका शेतकऱ्यांना बसला.यातून शेतकरी आता तरी सावरणे शक्य नाही. सर्वकाही येणाºया खरीप हंगामावर अवलंबून आहे. म्हणूनच शेतकºयांना या आर्थिक संकटातून उभे करण्यासाठी किमान खरीप हंगामासाठी लागणारे आर्थिक पाठबळ उभे करावे लागणार आहे. ते दरवर्षी शासनाकडून मिळतच असते; परंतु यावर्षी प्रतिकूल परिस्थितीतही शेतकºयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या बियाण्यावर शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन बियाण्याचा समावेश असतो. ही शेतकºयांसाठी दिलासादायक बाब आहे; परंतु यावर्षी पावसाळा तोंडावर आला असताना शेतकºयांना अनुदानावर बियाणे उपलब्ध झाले नाही.त्यामुळे बाजारात खासगी कंपन्यांच्या दरानुसार शेतकºयांना सोयाबीन खरेदी करावे लागत आहे. असे मोजकेच शेतकरी आहेत. जवळपास ९८ टक्के शेतकºयांनी अद्याप खरेदी केली नाही. गत १५ मे रोजी यावर निर्णय होणार होता; परंतु अद्याप झाला नाही. एकीकडे शासन शेतकºयाच्या बाजूने असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या योजनांचेच अनुदान देत नाही. हा विरोधाभास नाही का, असाही प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे.बाजारात इतर कंपन्यांचे बियाणे आले आहे. जर अनुदान वेळेत उपलब्ध झाले नाही, तर शेतकºयांना हे महागडे बियाणे घेण्यावाचून दुसरा पर्याय नसेल; पण किती शेतकरी हे महागडे बियाणे खरेदी करतील, असाही प्रश्न निर्माण होत आहे.अनुदानासंदर्भात अद्याप आमच्याकडे सूचना प्राप्त झाली नाही. झाल्यास महाबीजने तशी तरतूद केलेली आहे. अनुदानावरील बियाणे वाटपासाठीचे परमिट कृषी विभागामार्फत शेतकºयांना दिले जात असतात.- अजय कुचे,महाव्यवस्थापक, विपणन,महाबीज, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी