शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा; मनपा नगररचनाकार यांचे झोन अधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:42 IST

हवाल सादर करण्यास मागील दोन महिन्यांपासून टाळाटाळ करणाºया महापालिकेच्या झोन अधिकाºयांना आता १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली.

अकोला : शहरातील खुल्या तसेच शासकीय जागांवर उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांची व संबंधित जागेच्या मालकीचा इत्थंभूत माहिती अहवाल सादर करण्यास मागील दोन महिन्यांपासून टाळाटाळ करणाºया महापालिकेच्या झोन अधिकाºयांना आता १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थिती या तारखेपर्यंत धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश मनपाचे नगररचनाकार संजय पवार यांनी झोन अधिकाºयांना दिले आहेत. यादरम्यान, पूर्व झोन व पश्चिम झोनच्यावतीने अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती आहे.मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत रस्ते, शासकीय जागा, खुल्या जागांवर धार्मिक स्थळे उभारल्या जात असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सोसायटी फॉर जस्टीस या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जनहित याचिकेद्वारे राज्य शासनाला प्रतिवादी करण्यात आले होते. त्यावर शहरांमध्ये २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याचा उच्च न्यायालयाने आदेश जारी केला. महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २००९ नंतरच्या ४८ धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. तसा अहवाल राज्य शासनाकडे जुलै महिन्यात सादर करण्यात आला. दुसºया टप्प्यात २००९ पूर्वी उभारलेल्या ७३८ धार्मिक स्थळांनासुद्धा हटविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांना हटविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धार्मिक स्थळांचा मुद्दा नागरिकांच्या भावनेशी जुळलेला असून, मागील दोन वर्षांतील कारवाया पाहता सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात घेता २००९ पूर्वी उभारलेल्या व अतिक्रमण अडथळा ठरणाºया काही मोजक्या स्थळांना हटविण्यासाठी प्रशासन कामाला लागल्याची माहिती आहे. उर्वरित स्थळांना कायदेशीरदृष्ट्या कायम क रण्यासाठी सत्ताधारी व प्रशासनात खलबते पार पडत आहेत. त्यानुषंगाने चारही झोन अधिकाºयांना येत्या १० सप्टेंबरपर्यंत धार्मिक स्थळांच्या जागेचा मालकीनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश नगररचनाकार संजय पवार यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका