शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाई करणारे सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर  करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:39 IST

अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हाधिकार्‍यांचा तहसीलदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना  येणार्‍या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध  तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी  तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात  आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ा तील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली अस ता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या  ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणखी   १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यामध्ये तपासणीदरम्यान बंद  आढळून आलेल्या किंवा कर्जमाफीचा एकही अर्ज न  भरलेल्या सात सेतू केंद्रांना मंडळ अधिकारी आणि  तलाठय़ांनी दररोज भेटी देऊन कर्जमाफीचे ऑनलाइन  किती अर्ज भरले, किती बाकी आहेत, याबाबतची त पासणी करावी आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यात  दिरंगाई करणारे, बंद आढळून येणारे दोषी सेतू केंद्र बंद  करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना  दिला.

सुटीच्या दिवशीही कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे काम  सुरू! शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी  असली, तरी सुटीचे दोन्ही दिवस जिल्ह्यात  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सेतू  केंद्रांवर सुरू राहणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्या तील तहसीलदारांना आदेश दिला आहे.

१ लाख ३८ हजार शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे  अर्ज!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी  सायंकाळपर्यंंत १ लाख ७१ हजार १८८ शेतकर्‍यांच्या  अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ५४८ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी सांगितले.