शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दिले जनता दरबारात पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:52 IST

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले.

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले. त्यांची समस्या होती ती जंगलातील पाणी टंचाई, चारा प्रश्न अन् रस्ते अपघात.नेहमीप्रमाणे सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली. आपल्या विविध समस्यांना घेऊन नागरिक पालकमंत्र्यांसमोर हजर झाले. त्यांची गºहाणे ऐकून त्या सोडविण्याची कार्यवाही सुरू झाली, तोच काही विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत या जनता दरबारात प्रवेश केला. त्यांच्या आगमनामुळे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात राहणे अवघड झाले. दुष्काळी परिस्थितीत मानवी वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरातील पाळीव प्राण्यांसाठी योग्य अन्नाची सुविधा असते. गुरा-ढोरांसाठी चारा छावण्यासुद्धा शासनातर्फे चालविल्या जातात; परंतु याच काळात वन्य प्राण्यांचे जंगलात जगणे अवघड झाल्याची तक्रार यावेळी वन्य प्राण्यांनी केली. मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली आमची निवासस्थाने अन्न, पाण्यासाठी सैरभैर फिरताना होणारे अपघात यासह इतर अन्यायाची गाºहाणी यावेळी वन्य प्राण्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सभागृहातून परतीचा मार्ग धरला.या विद्यार्थ्यांनी साकारली वन्य प्राण्यांची वेशभूषाजानवी राठी, कृष्णा अटल, महक अग्रवाल, चिराग राठी, अथर्व लोखंडे या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा साकारली होती. या प्रसंगी न्यू विदर्भ फाउंडेशनचे आदित्य दामले, ललित यावलकर, सतीश वानरे, राकेश शर्मा, सतीश फाले, विकास मोळके, सूरज पातोंड, सूरज टापरे, वैभव धुळे, श्रीकांत आमले, सौरभ भगत आणि रणजित राठोड यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.या आहेत मागण्या

  1. कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
  2. मानवी अतिक्रमणापासून रक्षण करावे.
  3. अन्न पाण्यासाठी स्थलांतर करताना महामार्गावर होणारे वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात.
  4. सुरक्षित अधिवासाची सोय करावी.

वन्य प्राण्यांनाही तारीखच मिळणार का?पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात येणाऱ्या अनेकांना तारखा दिल्या जातात; परंतु यंदा विद्यार्थी चक्क वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दाखल झाले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनादेखील तारीख दिली जाणार का, असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील