अकोला : केंद्र शासनाच्या मिशन स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून, गुरुवारी शहरासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांसह शाळा-महाविद्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांंनी स्वच्छतेची शपथ घेतली. स्वत: अस्वच्छता करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, असा निश्चय करीत, स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर कार्यालयात अधिकारी, कर्मचार्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथे विविध शाळेतील विद्यार्थ्यांंनी सामूहिकरीत्या दृढ निश्चय करीत स्वच्छतेची शपथ घेतली. शपथ घेत प्रत्येक कार्यालय, महाविद्यालय व शाळांमध्ये स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली.
अधिकारी, कर्मचा-यांसह विद्यार्थ्यांनी घेतली ‘स्वच्छतेची शपथ’!
By admin | Updated: October 3, 2014 01:30 IST