शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी पिवंदळच्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:14 IST

रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून जाणे-येणे करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे.अकोट-तेल्हारा सीमेवर असलेल्या पिवंदळ खुर्द ते नांदखेडपर्यंतचा रस्ता पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, गत कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना या रस्त्यावरून जाणे-येणे करणे अवघड झाले आहे. इयत्ता पाचवीवरील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना नांदखेड, चोहोट्टा, अकोट व अकोला येथे येणे-जाणे करावे लागते; मात्र पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून पायदळ चालणेही अवघड झाले आहे.त्यामुळे पिवंदळ खुर्द ते नांदखेड या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही पिवंदळ खुर्द येथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी श्रीकृष्ण चौके, विठ्ठल मुंडाले, ओम बघे, दर्शन बिलेवार, डिगांबर बिलेवार, अनिष बिलेवार, ओमप्रकाश नंदाणे, शुभम भोंगरे, वैशाली बघे, नंदिनी बघे, रत्ना बिलेवार, वैष्णवी तळोकार, कोमल भगेवार, दुर्गा बघे, योगिता बघे, अश्विनी बघे, वैष्णवी भोंगरे, प्रतीक्षा नंदाणे आदी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विठ्ठल तळोकार, काशीनाथ बिलेवार, आनंदा बघे, रघुनाथ शिरकटे, गजानन बिलेवार यांच्यासह इतर ग्रामस्थ होते.पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पिवंदळ खुर्द येथील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत.-विठ्ठल तळोकार,अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, पिवंदळ खुर्द.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी