सचिन राऊत/ अकोलाबेताचीच आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, शिवाजी महाविद्यालयात शिकणार्या अशा विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ह्यकमवा व शिकाह्ण योजनेचे कवच मिळाले आहे. महाविद्यालयातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांचे ड्रेस शिवल्यानंतर अत्यल्प किमतीमध्ये विक्री करून मिळालेल्या पैशांमध्ये तब्बल २0 ते २५ विद्यार्थ्यांंचे पुढील शिक्षण सुरू आहे. महाविद्यालयातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी फलदायी, तर इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुमारे साडेचार हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामधील काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. रोजगारामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षणही सुरू ठेवता आले. साडेचार हजार विद्यार्थ्यांचे ड्रेस या योजनेतील २0 ते २५ विद्यार्थ्यांनी शिवले असून, त्यामधून विद्यार्थ्यांचा वार्षिक शैक्षणिक खर्च निघत आहे. कमवा व शिका योजना या विद्यार्थ्यांसाठी कवच ठरली आहे. *एक महिना दिले प्रशिक्षणशिवाजी महाविद्यालयातील आर्थिक मागास गरीब विद्यार्थ्यांना शिवणकामाचे धडे महाविद्यालयातच देण्यात आले. १५ एप्रिल ते १0 मे या कालावधीत ४0 विद्यार्थ्यांची डिझायनिंग आणि ड्रेसमेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. फॅशन डिझायनर आणि ड्रेसमेकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी व विद्यार्थिनींचे ड्रेस शिवणकाम करण्याचे कौशल्य अवगत झाले.
‘कमवा व शिका’ योजनेचे विद्यार्थ्यांना कवच!
By admin | Updated: October 28, 2014 00:54 IST