सुनील काकडे / वाशिमवैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली ह्यनीटह्ण परीक्षा द्यावी लागणार असल्याने तद्वतच महाराष्ट्रात तुलनेने शिक्षण महागल्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी चीनमधील वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेत आहेत. राज्यात वैद्यकीय शिक्षण पुरविणार्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम ह्यनीटह्णची परीक्षा द्यावी लागते. त्यात चांगले गुण मिळाल्यास ठरावीक मोठय़ा रकमेचे शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही आरक्षणनिहाय प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवूनही वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड होत आहे. चीनमधील विद्यापीठात मात्र प्रवेश घ्यायचा झाल्यास इयत्ता बारावीत किमान ८0 टक्के गुण आणि दरवर्षी विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्या ह्यऑनलाइनह्ण परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास कुठलीही आडकाठी न आणता थेट प्रवेश दिला जातो, अशी माहिती चीनमधील शानडाँग विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेल्या वाशिम येथील साईराज सुनील पाटील या विद्यार्थ्याने दिली. ह्यइलेक्ट्रॉनिक्सह्ण वस्तूनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत असलेल्या चीनने शैक्षणिक क्षेत्रातही कमालीची क्रांती केली आहे. वैद्यकीय शिक्षण पुरविणार्या चायनामधील महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या तुलनेत कमी शुल्क आकारले जाते. शिक्षण पूर्ण होईस्तोवर निवास, भारतीय भोजन आणि दज्रेदार शिक्षण पुरविल्या जात असल्याचे अनेक विद्यार्थ्यांंचे अनुभव आहेत. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना आरक्षणाचा कुठलाही अडथळा न आणता प्रवेश मिळत असल्यानेच सध्या चीनच्या महाविद्यालयांकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांंची पाऊले आपसूक वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तथापि, ही परिस्थिती लक्षात घेता राज्यातील गुणवंत विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ नयेत, याकरिता शासनासोबतच राज्यांतर्गत महाविद्यालयांनी शिक्षणासंदर्भातील विरोधात्मक बाबी टाळण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक ठरत आहे. विदर्भातील चार विद्यार्थी चीनमध्येचीनमधील शानडाँग विद्यापीठात ह्यएमबीबीएसह्ण या वैद्यकीय शिक्षणासाठी विदर्भातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात नागपूर येथील साहील वैद्य, पराग मोरे, आशीष देवूळकर आणि वाशिम येथील साईराज पाटील या विद्यार्थ्यांंचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची चीनकडे धाव!
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST