शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके आली; शाळा स्तरावर वाटप सुरू

By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST

अकोला महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची शालेय पाठय़पुस्तके प्राप्त झाली;शाळा स्तरावर वाटप सुरू

अकोला : महानगरपालिकेच्या मराठी, उर्दू व हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची शालेय पाठय़पुस्तके प्राप्त झाली असून, शाळा स्तरावर पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. गुरुवारी रामदास पेठस्थित मराठी मुलांची शाळा क्र.४ टेम्पल गार्डन येथे मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे संबंधित मुख्याध्यापकांना वितरण करण्यात आले.महापालिकेच्या अधिनस्त शाळांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी माध्यमाचे इयत्ता पहिली ते ८ वी पर्यंत ८ हजार ४0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येत्या २६ जूनपासून शालेय सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके व स्वाध्याय पुस्तिका सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झाली आहेत. यामध्ये मराठी माध्यमासाठी १२ हजार ९३0 पुस्तकांची मागणी केली असता सर्व पुस्तके प्राप्त झाली. हिंदी माध्यमासाठी ५ हजार ६२७ पुस्तके प्राप्त झाली असून, वर्ग ३ रा परिसर अभ्यास, वर्ग ६ वा इतिहास व वर्ग ७ वा सामान्य विज्ञान या विषयाची ३४९ पुस्तके मिळणे बाकी आहे. उर्दू माध्यमाच्या एकूण १७ हजार ९७४ पुस्तकांपैकी १४ हजार ७७३ पुस्तके मिळाली असून, वर्ग ३ रा परिसर अभ्यास, वर्ग ४ था बालभारती तसेच परिसर अभ्यास व गणित या विषयाची ३ हजार २0१ पुस्तके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. शैक्षणिक सत्र सुरू होण्याचा कालावधी लक्षात घेता, गुरुवारी मनपा मराठी मुलांची शाळा क्र.४ येथे मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.संबंधित मुख्याध्यापकांना सहाय्यक आयुक्त अनिल बिडवे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र ढवळे, प्रभारी लेखाधिकारी मो.अन्वर हुसेन, केंद्र समन्वयक हबीबुर्ररहमान यांनी पुस्तकांचे वितरण केले. उर्दू व हिंदी माध्यमाच्या पुस्तकांचे अनुक्रमे ६ जून व ७ जून रोजी वितरण केले जाईल.