शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:33 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे.

अकोला : गत चार-पाच वर्षात विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढला असून, दरवर्षी १ लाखावर विद्यार्थी प्रवेशासाठी ‘सीईटी’ सामायिक प्रवेश परीक्षा देत आहेत. यावर्षीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे.(एमसीईएआर) महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ ही चार कृषी विद्यापीठे असून, विद्यापीठे व खासगी कृषी महाविद्यालये मिळून राज्यात १९० कृषी महाविद्यालये आहेत. बी.एससी प्रथम वर्षासाठीची प्रवेश क्षमता एकूण १४,७०० आहे. गत चार-पाच वर्षांपासून राज्यात जवळपास १ लाखावर विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज केले होते. जागा १४ हजार ५०० च्या जवळपास असल्याने उर्वरित हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार बी.एससी. कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भात डॉ. पंदेकृवि अंतर्गत शासकीय महाविद्यालयात सीईटी घेतली जाते. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाने नियोजन करण्यात सुरुवात केली आहे.

हे आहेत बी. एससीचे विषयबी. एससी पदवीसाठी बी. एससी कृषी, उद्यानविद्या शास्त्र, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान आदी विषय आहेत.

 अलीकडच्या काही वर्षात विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढल्याने प्रवेश वाढले आहेत. या अनुषंगाने एमसीईएआर केंद्रीय पद्धतीने सीईटी परीक्षा घेते. तथापि, ही परीक्षा कृषी विद्यापीठाच्या केंद्रावर घेतली जात असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.- डॉ. प्रदीप जी. इंगोले,संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ