शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने तरुणीस चिरडले!

By admin | Updated: April 1, 2016 00:54 IST

आकोट - हिवरखेड मार्गावरील अडगाव फाट्यावरील अपघात; चालकाला तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी.

अडगाव खुर्द / रुईखेड (ता. आकोट): पीर बाबाच्या दर्शनाकरिता वडिलांसोबत जात असलेल्या तरुणीचा ट्रकने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. ही घटना आकोट - हिवरखेड मार्गावरील अडगाव खुर्द फाट्यावर गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. चालकाला अटक करण्याच्या मागणीसाठी चार तास मृतदेह घटनास्थळावरून हलवू दिला नाही. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तालुक्यातील मार्डी या आदिवासीबहुल भागातील शंकर लाला मोरे हे त्यांची १९ वर्षीय मुलगी जमुना हिच्यासोबत एम एच २७ के ८४९ क्रमांकाच्या मोटारसायकलने गोर्धा येथे पीर बाबांच्या दर्शनाकरिता जात होते. यावेळी अडगाव खुर्द फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभे असताना एम एच १४ बी जे २५५३ क्रमांकाच्या ट्रकने जमुना हिला धडक दिली. त्यामध्ये तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. जमुना हिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. आकोटवरून अडगावकडे जाणार्‍या या ट्रक चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून ट्रक न थांबविता तो पळून गेला. हा ट्रक अडगाव बु. या ठिकाणी पकडण्यात आला. आकोट ग्रामीण पोलिसांनी शंकर लाला मोरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक आरोपी जहीरबेग जमीरबे (२५, रा. पंचगव्हाण) विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, सदर ट्रक हा अडगाव बु. येथील लखनलाल प्रतापसिंह ठाकूर यांचा असल्याचे आकोट ग्रामीण पोलिसांनी सांगितले.