लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कुख्यात दुचाकी चोरटा चिंतामण गालट याला रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त केली. दुचाकी चोरटा चिंतामण गालट हा बुधवारी रात्री संशयास्पद हालचाली करताना रामदासपेठ पोलिसांना मिळून आला. ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली असता, त्याने एक दुचाकी चोरली असल्याची माहिती दिली. त्याला अटक करून गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गतवर्षीसुद्धा चिंतामण गालट याच्याकडून एक दुचाकी जप्त केली होती. ही दुचाकीसुद्धा चोरीतील असल्याचे समोर आले आहे. शहरात यापूर्वीही गालट याने दुचाकी लंपास केल्या आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या दुचाकी मिळण्याच शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कुख्यात दुचाकी चोरट्यास अटक
By admin | Updated: June 30, 2017 01:11 IST