शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किडनी आजाराने त्रस्त मनोजचा संघर्ष

By admin | Updated: March 26, 2017 19:27 IST

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या शिवणी खदान येथील मनोज वानखडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे.

आईने देऊ केली किडनी; प्रत्यारोपणासाठी मदतीची गरजशिवणी खदान (अकोला) : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या शिवणी खदान येथील मनोज वानखडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. त्याच्या आईने किडनी देऊ केल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे पैसाच नाही. त्यामुळे, समाजातील दानशूर लोकांनी मदत केल्यास मनोजचे प्राण वाचू शकणार आहेत. शिवणी खदान येथील मोहन वानखडे हे दोन मुले व पत्नी बरोबर राहतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांचा मोठा मुलगा मनोज हा मोलमजुरी करून कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावतो, तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. अशातच मनोजला पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे निदान केले असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले. मनोजवर मुंबईतील केएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आधीच अठराविश्‍वे दारिद्रय़ असल्याने मोहन वानखडे यांनी आपल्याकडे असलेला पैसा मुलाच्या उपचारावर लावला आहे. मात्र, खर्च जास्त असल्याने ते पुढील उपचार करण्यास असर्मथ असल्याचे दिसत आहेत. नातेवाईक व गावातील लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी आतापर्यंत उपचार केले आहेत. किडनी देण्यासाठी दाता समोर येत नसल्याने तसेच विकत घेण्याएवढे पैसे नसल्याने मनोजची आई शालुबाई यांनी मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शालुबाई यांच्या सर्व तपासण्याही करण्यात आल्या आहेत. मात्र, किडनी प्रत्यार्पणासाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोजवर मुंबई येथे उपचार सुरू असून, दररोज डायलिसीस करावे लागत आहे. मनोजच्या उपचारासाठी लहान भावाने शिक्षण सोडले आहे. मनोजची पत्नी व अकरा महिन्यांची मुलगी मुंबईतच असून, त्याची सेवा करीत आहे. समाजातील दानशूर लोकांनी मदत केल्यास मनोज वानखडे यांचा संघर्ष संपणार आहे. त्यासाठी गरज आहे ती दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची. (वार्ताहर)