शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

कडेकोट पोलीस बंदोबस्त!

By admin | Updated: September 19, 2016 02:51 IST

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर १0५0 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

अकोला, दि. १८: मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर रविवारी मुख्यालय मैदानावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चा मार्गादरम्यान १0५0 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि अँट्रॉसिटी कायद्यात बदल, मराठा आरक्षणासाठीच्या विषयांना घेऊन अकोल्यात सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूक मोर्चा सोमवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने जिल्हय़ासोबतच अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्हय़ातील मराठा समाज सहभागी होणार आहे. विराट मोर्चाचे नियोजन बघता, पोलीस दलानेसुद्धा रविवारी पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस बंदोबस्ताची तालीम घेतली आणि पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना तैनातीची ठिकाणे नेमून देण्यात आली. मोर्चा बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील हे सहकार्य करतील. मोर्चासाठीच्या बंदोबस्तासाठी जिल्हय़ातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांची अतिरिक्त कुमक मागविली आहे. यासोबतच फिक्स पॉइंट ठरविण्यात आले असून, मोर्चाचे व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा करण्यात येणार आहे. पोलीस कॅमेरे करणार मोर्चाचे चित्रीकरणमोर्चात येणार्‍या लाखो मराठा बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि समाजविघातक कृत्य करणार्‍यांना अटकाव करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या चार चमूंकडून मोर्चाचे अकोला क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे मोर्चाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. बॉम्बशोधक पथक, श्‍वानपथकही राहील तैनातलाखोंच्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुरक्षेच्या कारणावरून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मेटल डिटेक्टरच्या कमानी उभारण्यात येणार आहेत. डिटेक्टर मशीनने तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. तसेच बॉम्बशोधक पथक आणि श्‍वानपथकसुद्धा मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी फिरून तपासणी करणार आहे.१,0५0 पोलीस तैनात एएसपी                        0१डीवायएसपी                  0४पोलीस निरीक्षक           १४एपीआय, पीएसआय     ६५पोलीस कर्मचारी         ८२५महिला कर्मचारी         १४२ एकूण                     १0५0