शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय : कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:41 IST

अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध केले. याचा अभ्यास करू न पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअनुदानासाठी गुजरात सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा अभ्यास करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध केले. याचा अभ्यास करू न पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात बीटी कापसावरील बोंडअळीचे व्यवस्थापन कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. या कार्यशाळेला राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. या कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांनी बोंडअळीवर दीर्घ चर्चा केली. नेमक्या करावयाच्या उपाययोजना यावर मंथन झाले. या कार्यशाळेत गुजरातच्या आनंद विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.पी.के. बोराड तसेच डॉ. हिमांशू देसाई यांची उपस्थिती होती. त्यांनी गुजरातमध्ये कपाशीवरील बोंडअळीवर केलेले काम, विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यासाठी मात्र शासनाचे पाठबळ मिळाले, असे सांगितले. गुजरात शासनाने एक धोरणात्मक निर्णयच घेतला आहे. बीटी कापसावरील बोंडअळीला कामगंध सापळे प्रभावी नियंत्रण ठरू  शकत असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच बोंडअळी येण्याची कारणे, रिफ्यूजी बीटी कापसाचा करावयाचा वापर, बोंडअळीच्या आगमनाची चाहूल, जीवनक्रम, बोंडअळी ओळखणे, बोंडअळीग्रस्त कपाशीची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीची माहिती  शेतकºयांना देण्यात आली. त्याचा फायदा झाला असून, बोंडअळीवर ७० टक्क्याच्यावर नियंत्रण या मार्गाने मिळविण्यात आले.याच अनुषंगाने  गुजरातच्या विविध उपाययोजनांची माहिती व धोरणात्मक निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच या कार्यशाळेत झालेल्या विविध तांत्रिक विषयावरील निष्कर्ष महाराष्टÑ शासनाला सादर करण्यात येणार आहेत.

- कृषी विद्यापीठाने घडीपत्रिका, भित्तीपत्रके तयार केली आहेत. विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठीची माहिती दिली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांनतर आणखी व्यापक कार्यक्रम हाती घेतले जातील.- डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

- गुुजरात राज्याने केलेल्या बोंडअळीवरील विविध उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येणार असून, कार्यशाळेतील निष्कर्ष व त्यासाठीच्या अंमलबजावणीसाठी शासनाला सादर केले जाणार आहे. तसेच मराठवाड्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिनिंग संचालक, शेतकरी विक्रेत्यांची कार्यशाळा घेणार आहे. - डॉ. बी. व्यंकटेश्वरलू,कुलगुरू ,स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. 

टॅग्स :AkolaअकोलाGujaratगुजरातcottonकापूस