शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटीपी’ची जागा अकोला महानगर पालिकेला हस्तांतरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:10 IST

भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला. ‘एसटीपी’ची जागा निश्‍चित झाल्यामुळे वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे शिक्कामोर्तबबांधकाम मंत्र्यांच्या हस्ते महापौरांना ताबा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला. ‘एसटीपी’ची जागा निश्‍चित झाल्यामुळे वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून शहरात सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य शासनाने ३0 आणि सात एमएलडी असे दोन प्लान्ट उभारण्यासाठी ७९ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. मनपा प्रशासनाने ६१ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रकाशित करताना त्यामध्ये ‘एसटीपी’साठी जागेचा समावेश क रणे आवश्यक होते. ‘एसटीपी’च्या जागेशिवाय निविदा मंजूर करण्यात आल्यामुळे योजनेला ‘वर्क ऑर्डर’ देताना प्रशासनासमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मनपा प्रशासनाने शिलोडा परिसरातील सहा एकर जागा निश्‍चित करून, तसा प्रस्ताव सहायक संचालक नगररचना विभागाकडे सादर केला असता, या विभागाने ‘डीपी प्लॅन’वर ‘एसटीपी’साठी जागा निश्‍चित केली. जागेला हस्तांतरित करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असल्यामुळे जागेचा ताबा घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जागेचा ताबा देण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Vijay Agarwalविजय अग्रवालchandrakant patilचंद्रकांत पाटीलAkola cityअकोला शहर