अकोला: मंगळवारी रात्री आकोट, तेल्हार्यासह जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यासोबतच वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले असून, वृक्ष उन्मळून पडले आहे. मंगळवारी मध्यरात्री अचानक अवकाळी पाऊस बरसला. जोरदार सरींसर हवाही सुसाट असल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर घरांचेही नुकसान झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या शेतामध्ये रब्बी हंगामातील पिके असून, या पिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसाचा जोर आकोट व तेल्हार्यात जास्त असल्यामुळे या भागात नुकसानाची पातळी अधिक आहे. या भागातील फळबागांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. बार्शिटाकळी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाळ्यात अल्प पावसामुळे पिके आली नसल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकर्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेत करी त्रस्त झाले आहेत.
अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचे थैमान
By admin | Updated: February 12, 2015 01:17 IST