शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

तूर-हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याच्या गोदामांचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:20 IST

अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे.

ठळक मुद्दे५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर आणि ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे.गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये अद्याप पडून आहे.जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात तूर व हरभरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

- संतोष येलकरअकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. त्यामुळे गोदामांमध्ये जागा नसल्याने तूर व हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याने खासगी गोदाम घेण्यासाठी राज्य वखार महामंडळाकडून गोदामांचा शोध घेतला जात आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर आणि ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा जिल्ह्यातील राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येत आहे; परंतु गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये अद्याप पडून आहे. त्यातच यावर्षी नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेली तूर व हरभरा साठविण्यात येत असल्याने, जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात तूर व हरभरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी आता भाडेतत्त्वावर गोदाम घेण्याची तयारी वखार महामंडळामार्फत सुरू करण्यात आली असून, भाड्याने गोदाम कोठे मिळणार, याबाबतचा शोध घेण्यात येत आहे.

खरेदी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर; शेतकरी पेचात!नाफेडमार्फत तूर व हरभरा खरेदीत साठवणुकीसाठी जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये जागा नसल्याने, जिल्ह्यातील केंद्रांवर तूर-हरभरा खरेदी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तूर-हरभरा साठवणुकीचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार आणि खरेदी सुरळीत केव्हा होणार, असा पेच जिल्ह्यातील तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

सात केंद्रांवर अशी करण्यात आली तूर-हरभरा खरेदी!नाफेडमार्फत खरेदीत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये २८ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही केंद्रांवर ७७ हजार क्विंटल तूर आणि २ हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदीत खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तूर-हरभरा साठवणुकीसाठी खासगी गोदाम भाड्याने घेण्याची कार्यवाही वखार महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे.-राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती