शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य कीटकनाशकांचा केला साठा; कृषी विभागाची पोलिसात तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:10 IST

अकोला: नियमबाह्य कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने मंगळवारी दोन एन्टरप्रायजेस व एका कंपनीविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देएका कंपनीने विदर्भातील आपल्या एका वितरकाकडून कीटकनाशके मागविली होती. एन्टरप्रायजेसला सात दिवसात खुलासा मागविला होता व कीटकनाशके विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी ही तक्रार कायदेविषक पडताळणीसाठी पाठविली आहे.

अकोला: नियमबाह्य कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने मंगळवारी दोन एन्टरप्रायजेस व एका कंपनीविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार कायदेविषक पडताळणीसाठी पाठविली आहे.एका कंपनीने विदर्भातील आपल्या एका वितरकाकडून कीटकनाशके मागविली होती. ती कीटकनाशके बोगस असल्याचा ठपका सुरुवातीला मोहीम अधिकारी व गुण नियंत्रण विभागाने ठेवून कीटकनाशके कायदा १९६८ चे कलम २१ (१) अन्वये सदर साठा विक्री बंदचा आदेश दिला होता. यासंदर्भात इमामॅक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी (मिसाइल) या कीटकनाशकांचे नमुने १ आॅगस्ट २०१८ रोजी घेऊन ४ आॅगस्ट २०१८ रोजी अमरावती येथील कीटकनाशक विश्लेषण कार्यशाळेत पाठविण्यात आले होते. तसेच बुरशीनाशक कार्बेनडेझिम ५० टक्के डब्ल्यू.पी. (बाविस्टीन) चे नमुने ४ आॅगस्ट २०१८ रोजी घेऊन ६ आॅगस्ट २०१८ रोजी अमरावतीच्या प्रयोगशाळेत चाचणी घेण्यासाठी पाठविले होते. या साठ्याच्या अभिलेखाची तपासणी अकोल्यातील एन्टरप्रायजेसकडे केली असता. सदरचा कीटकनाशकांंचा साठा प्रधान प्रमाणपत्रानुसार न घेता नागपूरच्या एका एन्टरप्रायजेसकडून खरेदी करण्यात आल्याचे समोर आल्याने तसा तपासणी अहवाल देऊन सदर एन्टरप्रायजेसला सात दिवसात खुलासा मागविला होता व कीटकनाशके विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते.दरम्यान, ७ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्ह्यातील भरारी पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हा साठा जप्त करू न साठ्याची विक्री किंवा विल्हेवाट न लावण्याच्या अटीवर अकोल्याच्या एन्टरप्रायजेसच्या ताब्यात देण्यात आला. असे असले तरी अकोला कृषी विभागाने केलेल्या चाचणीत ते उत्पादन स्वीकृत (पास) ठरल्याचे समोर आले आहे; पण कीटकनाशक कायदा १९६८ च्या कलम २९ (२) व कीटकनाशक नियम १९७१ च्या नियम १० (४)(ए)(।) चे उल्लंघन केल्याने शिक्षेस पात्र ठरत असल्याने २४ आगस्ट रोजी अकोला येथील विद्यमान न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे प्रकरण पुढील आदेश मिळेपर्यंत दाखल करण्यात आले आहे.

-आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी करू न पुढील कारवाई करण्यात येईल.शैलेश सपकाळ,ठाणेदार,रामदासपेठ पोलीस ठाणे,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती