शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

'वखार'च्या गोदामातून खराब गव्हाची उचल थांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:17 IST

सोबतच गुणवत्ता तपासणी प्राप्त झाल्याशिवाय गव्हाची उचल केली जाणार नाही, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना कळविली आहे.

अकोला: जिल्ह्यातील लाभार्थींना वाटप करण्यासाठी ‘एफएक्यू’ दर्जाचा गहू पुरवठा करण्याचे पत्र जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्यानंतरही गहू केंद्र शासनाच्या एफएक्यू निकषाचा असल्याचे सांगत त्याचा पुरवठा एफसीआयने सीडब्ल्यूसीच्या गोदामातून सुरू केला. त्यानंतर पातूर, बाळापूरसह जिल्ह्यातील सर्वच गोदामात खराब गव्हाचा पुरवठा करीत थेट जिल्हाधिकाऱ्यांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार या दोन्ही यंत्रणांनी केला आहे. याप्रकरणी त्यांना पत्राद्वारे जाब विचारला जात असल्याचे संकेत आहेत. सोबतच गुणवत्ता तपासणी प्राप्त झाल्याशिवाय गव्हाची उचल केली जाणार नाही, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना कळविली आहे.एफसीआयने (भारतीय खाद्य निगम) भाड्याने घेतलेल्या सीडब्ल्यूसीच्या (केंद्रीय वखार महामंडळ) गोदामात गव्हाचा साठा करणे सुरू झाले. फेब्रुवारीपासून मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथून या गोदामात गहू आणला जात आहे. दरम्यान, ४ -५ मार्च रोजी गोदामातील साठा ७० हजार पोत्यांपर्यंत पोहोचला. त्यावेळी काही पोती फाटली, काही अनवधानाने फुटली. त्यामध्ये असलेला गहू खापरा कीडग्रस्त, पाण्याने भिजलेला, १७ टक्क्यांपेक्षाही अधिक आर्द्रतेचा असल्याचे वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांना आढळले. त्यांनी तातडीने एफसीआयच्या भोपाळ, नागपूर, सीडब्ल्यूसीच्या मुंबईतील प्रादेशिक व्यवस्थापकांना माहिती दिली. पत्रात गव्हाची अवस्था नमूद केली. सोबतच गोदामातील ७० हजारांपैकी किती पोत्यातील गहू खराब आहे, ही बाब बाह्यदर्शनी सांगता येत नाही. प्रत्येक पोते तपासून पाहणेही शक्य नाही, त्यामुळे गव्हाच्या साठ्याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर एफसीआयच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाने गुणवत्ता निरीक्षक पी. के. बिहारी यांना तातडीने अकोल्यात पाठविले. त्यांनी १५ मार्च रोजी अवघ्या तीन तासांत पाहणी करीत अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार एफसीआयचे नागपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक किशोरीलाल यांनी वखारच्या गोदामातील गहू केंद्र शासनाच्या निकषात एफएक्यू दर्जाचा असल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले, तसेच गव्हाची उचल सुरू करण्याचेही म्हटले. उचल सुरू झाल्यानंतर बाळापूर, पातूरसह जिल्ह्यातील सर्वच गोदामात खराब गव्हाचे पोते आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गोदामातील गहू खराब असताना त्याची उचल करण्यासाठी एफएक्यू दर्जाचा असल्याचे पत्र एफसीआयच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी देत जिल्हाधिकाºयांची ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिशाभूल करण्याचा प्रकार घडला आहे.त्यापूर्वी वखारच्या गोदामातून पुढील आदेशापर्यंत उचल थांबविण्याचे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. आर. पी. वानखेडे यांनी दोन्ही व्यवस्थापनांना गुरुवारी देण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोला