शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची दिशाभूल बंद करा - शेकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:02 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्‍यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मंगळवारी देण्यात आले.

ठळक मुद्देशेकापचे निवेदन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ासह संपूर्ण राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाने पिचले आहेत. चारही बाजूंनी आलेल्या संकटांमुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी नागवला गेला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्‍यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मंगळवारी देण्यात आले.शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे धोरण प्रत्यक्षात शेतकरीविरोधी आणि व्यापारी व दलाल धाजिर्णे आहे. न्याय्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, कर्जमाफीवरून शेतकर्‍यांची केली जात असलेली दिशाभूल बंद करावी व त्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेती पंप देयकांची थकबाकी वसुली बंद करावी, शेतकर्‍यांचा माल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, कमी भावाने विकल्या गेलेल्या शेतमालाच्या फरकाची रक्कम शेतकर्‍यांना प्रदान करावी, बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दरहेक्टरी ५0 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदीप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस दिनेश काठोके, मध्यवर्ती समिती सदस्य सुनील मोडक, तालुका चिटणीस विजय मोडक, तालुका चिटणीस संजय चिंचोळकर, अँड. संतोष भोरे, जिल्हा संघटक दादासाहेब वाकोडे, मु. मुजामिल पांडे, संतोष देशमुख, प्रशांत लासुरकर, राजेंद्र काळणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर