शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाण्यांचा काळाबाजार रोखा! - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 14:07 IST

खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.

अकोला: खतांचा व बियाण्यांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागासह इतर संबंधित यंत्रणेने दक्ष राहावे तसेच कोणत्याही शेतकऱ्याला येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्वतयारी आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी झाली. यावेळी अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर वृक्ष लागवड या योजनेसाठी शेतकºयांना आवळा, बोर, सीताफळ यासारखी वृक्ष पुरविण्यात यावी, यासाठी वन विभाग व कृषी विभागाने संयुक्तरीत्या प्रयत्न करून ही योजना यशस्वी करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. दरम्यान, यावर्षी बियाणे, खते व कीटकनाशके याबाबत कोणत्याही शेतकºयाची तक्रार येऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी २४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सात भरारी पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. कपाशीचा पेरा वाढणार!यावर्षी कपाशीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत वाढणार आहे. यावर्षी १.६५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड खरीप हंगामात होणार आहे, तर सोयाबीनची लागवड जवळपास १.६५ लाख हेक्टरवर होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांनी दिली. यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव ९० टक्के कमी होईल, असा दावा कृषी विभागाने केला. ६४ हजार क्विंटल बियाण्यांची गरज!यावर्षी ६४ हजार २६१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ६० हजार ५७२ क्विंटल बियाणे महाबीजमार्फत पुरविण्यात येणार आहेत. बीटी बियाण्याची ७ लाख २० हजार पाकिटांची मागणी असून, यामध्ये अजित-११५, मलिका-२०७ व राशी-६५९ या जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी एकूण ८४ हजार ९९० मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खताची व बियाण्याची कोणतीही कमी असणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील