शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तलावात विहीर खोदून पाणी चोरले!

By admin | Updated: March 17, 2016 02:28 IST

मेहकर तालुक्यातील घटना; तीन शेतक-यांविरुद्ध गुन्हा दाखल.

मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील घाटबोरी येथील तीन शेतकर्‍यांनी कनका शिवारातील तलावात विहीर खोदून त्यातील पाणी चोरल्याचा प्रकार १६ मार्च रोजी उघडकीस आला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून पाण्याची चोरी करणार्‍या तीन शेतकर्‍यांविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यल्प पावसामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. त्यामुळे सिंचन तलावातून अवैध पाण्याचा उपसा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे, तसेच सिंचन तलावाच्या २00 मीटर परिसरात विहीर खोदकाम करण्यास शासनाची मनाई आहे; परंतु तालुक्यातील घाटबोरी येथील पुंजाजी जानकीराम पाखरे, राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या तीन शेतकर्‍यांनी संगणमत करून कनका शिवारातील सिंचन तलाव घाटबोरी येथे २00 मीटर परिसरात विहीर खोदकाम करण्यास मनाई असतानाही तलावात विहीर खोदून सिमेंटने सदर विहीर बांधून घेतली. ४ जानेवापासून विहिरीत मोटरपंपद्वारे पाण्याची चोरी करून स्वत: च्या शेतातील कांदा पिकास पाणी दिले. त्यामुळे तलावाची खराबी करून नुकसान केले. यासंदर्भात जि.प.सिंचन उपविभागीय अधिकारी सच्चिदानंद नीळकंठ पाटील यांनी १६ मार्च रोजी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पुंजाजी जानकीराम पाखरे, राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या तीन शेतकर्‍यांविरुद्ध कलम १८८, ३४, ३७९, ४२७, ४३0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.