शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा; प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:52 IST

अकोला : राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाऱ्या ...

अकोला: राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री व वापर सुरू आहे. शुक्रवारी रात्री अचानक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत वाशिम बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा टाकू न प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी दोन्ही गोदामांना कुलूप लावण्यात आले असून, त्या ठिकाणी मनपाच्या सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे.शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी आणल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येते. शहरात खुलेआम प्लास्टिकपासून तयार होणाºया विविध वस्तू व पिशव्यांचे उत्पादन व विक्री होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर करणाºया व्यावसायिकांविरोधात कारवाईचा आदेश जारी केला. शुक्रवारी रात्री वाशिम बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारात मगनलाल गोपाल अ‍ॅण्ड सन्स आणि जोगी ट्रेडर्सच्यावतीने दुकान व गोदामात प्लास्टिकपासून तयार पत्रावळी, द्रोण, ग्लास, चमचे आदी मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती आयुक्त संजय कापडणीस यांना मिळाली. यावेळी आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे प्रशांत राजूरकर, बाजार व परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर तसेच सुरक्षारक्षकांनी किराणा बाजारातील गोदाम व दुकानाला कुलूप लावण्याची कारवाई केली.दुकान संचालकाने काढला होता पळ!महापालिकेचे उपायुक्त प्रमोद कापडे यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्यात नवीन किराणा बाजारात धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी मगनलाल गोपाल अ‍ॅण्ड सन्स यांच्या गोदामात प्लास्टिक पत्रावळींचा मोठा साठा आढळून आला होता. त्यावेळी संबंधित संचालकाने पळ काढल्यामुळे मनपाने दुकानाला सील लावण्याची कारवाई केली होती. शुक्रवारी खुद्द आयुक्तांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आल्याने प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शासनाने निर्बंध आणलेल्या प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार वस्तूंची विक्री करता येत नाही. बाजारात ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांनी कुचराई केल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी