शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

स्टिंग ऑपरेशन : डॉक्टर नाही, आता तुम्ही उद्या या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:32 IST

‘लोकमत’ने गत आठवडाभरात बाह्यरुग्ण विभागासह एक्स-रे, सोनोग्राफी विभागाची पाहणी केली.

- प्रवीण खेतेअकोला : आपत्कालीन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ‘आता डॉक्टर किंवा तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत, तुम्ही उद्या या...’ अशी उत्तरे देत कर्मचाऱ्यांकडूनच रुग्णांची हकालपट्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सर्वोपचार रुग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून समोर आला आहे.ग्रामीण भागातूनच नाही, तर शेजारील जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येथील सर्वोपचार रुग्णालयात येतात; पण ऐन वेळेवर डॉक्टरच्या अनुपस्थितीत अन् इतर कर्मचाºयांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिली जाणारी अपमानजनक वागणुक ीचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला. ‘लोकमत’ने गत आठवडाभरात बाह्यरुग्ण विभागासह एक्स-रे, सोनोग्राफी विभागाची पाहणी केली. दरम्यान, एक्स-रे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन विभागातील डॉक्टर आणि तंत्रज्ञ एक तास आधीच बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणारा हा विभाग दुपारी १ वाजताच बंद होतो. यावेळी लोकमत प्रतिनिधीने रुग्णाचा नातेवाईक म्हणून येथील कर्मचाºयाला विचारले असता, तेथील कर्मचाºयाने ‘तुम्ही उद्या या..., डॉक्टर आता त्यांच्या दवाखान्यात गेले, असे सांगत सोनोग्राफी विभागातून बाहेर काढण्यास सुरुवात केली.प्रॅक्टीस खासगीत ‘एनपीए’ शासकीयडॉक्टरांनी पूर्णवेळ शासकीय रुग्णालयातच रुग्णसेवा द्यावी, यासाठी शासनाकडून डॉक्टरांना व्यवसाय प्रतिरोध भत्ता म्हणजेच एनपीए दिल्या जातो; परंतु त्यानंतरही येथील काही मोजके डॉक्टर अन् तंत्रज्ञ वगळता बहुतांश डॉक्टर आणि तंत्रज्ञांची खासगीत प्रॅक्टीस सुरू असल्याचाही प्रकार यावेळी निदर्शनास आला.अधिकारी म्हणतात, ही सेवा २४ तास सुरूया प्रकारासंदर्भात येथील अधिकाºयांशी चर्चा केली असता, एक्स-रे, सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन विभाग अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे नियमानुसार, ही सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासनाला डॉक्टर सोडून जाण्याची भीतीआधीच डॉक्टरांची संख्या कमी असून, त्यांच्यावर कारवाई केल्यास ते देखील सर्वोपचार रुग्णालय सोडून गेल्यास रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती रुग्णालय प्रशासनाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत सर्वोपचार रुग्णालयात अनेकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय