शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

  Sting operation : प्रवासासाठी विना तपासणीच दिले जाते वैद्यकीय पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:43 IST

सर्वोपचार रुग्णालयात विना प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पास दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गत दोन दिवसांत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला.

अकोला : राज्यांतर्गत होणाऱ्या स्थलांतरणामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्यांना सर्वोपचार रुग्णालयात विना प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पास दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गत दोन दिवसांत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रशासनामार्फत विविध स्तरावर उपाययोजनाही केल्या जात आहेत; मात्र तरीही कोरोना रुग्णसंख्या वाढीचे सत्र सुरूच आहे. अशातच ‘लोकमत’ चमूने गत दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन केले. दरम्यान, कोरोनाच्या फैलावाला सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासनाचीही बेफिकिरी कशी कारणीभूत आहे, याचा खुलासा झाला. जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी प्रशासनाच्या पासची आवश्यकता आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. याकरिता वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु येथे डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी न करता येणाºया प्रत्येक व्यक्तीला थेट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, याचीदेखील पडताळणी होत नसल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रकार जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींसोबतही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्याबाहेरून येणाºया बहुतांश व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटीनचे शिक्केदेखील नसल्याची माहिती आहे. ही बेफिकिरीदेखील जिल्ह्यातील वा इतर जिल्ह्यात रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरू शकते; परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.असे केले स्टिंगसर्वोपचार रुग्णालयातील कोरोना बाह्यरुग्ण विभागात प्रवासाच्या पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. गत दोन दिवस लोकमत चमूने त्या ठिकाणी पाहणी केली. बुधवारी पुणे येथे जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी विचारणा केली. यावेळी येथील कर्मचाºयांनी आधार कार्डाची मागणी केली,आधार कार्ड दिल्यावर त्यावरील नावाची खात्री करून कोणतीही तपासणी न करता वैद्य्रकीय तपासणी नंतरच्या प्रवासाची पास दिली. यावेळी रांगेत असलेल्या काही नागरिकांकडून तर केवळ नाव आणि वय विचारून वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले. या ठिकाणी त्यांना वैद्यकीय तपासणीसंदर्भात विचारले असता, ही पास मिळाल्यावर वैद्यकीय तपासणीची गरज नसल्याचेही तेथील एका कर्मचाºयाने सांगितले.गुरूवारी आणखी एक पास मिळविण्यासाठी लोकमतची चमू तिथे पोहचल्यावर अमरावतीसाठी पास हवी असल्याचे सांगीतल्यावर तेथील कर्मचाºयाने नाव विचारले, तसेच सोबत कोण जाणार आहे का याची विचारणा केली. यावर चमुतील सदस्याने पत्नी व मुलीचे नाव सांगीतल्यावर त्यांचीही नावे पासवर नमुद करून अवघ्या काही मिनिटात पास उपलब्ध करून दिली.

इन्टर्नच्या भरवशावर ओपीडीसर्वोपचार रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवासाकरिता लागणाºया वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते; परंतु ही जबाबदारी इन्टर्न डॉक्टरांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचे चित्र दिसून येते.काय आहे नियम?सर्दी, खोकला, ताप आणि थकवा या लक्षणांची तपासणी आवश्यक आहेत. थर्मल मीटरद्वारे शरीराच्या तापमानाची तपासणी आवश्यक.

 

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय