शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

Sting Operation : अकोला जिल्ह्यातील अनेक चेकपोस्ट नावापुरतेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:15 IST

लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक ठिकाणी चेकपोस्ट केवळ नावालाच उभारल्याचे समोर आले.

ठळक मुद्देअनेक चेकपोस्टवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले.वाहनांना थांबवून विचारणा करण्यात येते व नोंद घेऊन सोडून देण्यात येते.काही ठिकाणी कर्मचारी दांडी मारत असल्याचे आढळून आले.

अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अकोला शहर कोरोनाचे हॉटस्पाट झाले असून, २५० वर आकडा गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्याच्या सीमा बंद करून विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. या चेकपोस्टवर पोलिसांसह शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र १८ मे रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक ठिकाणी चेकपोस्ट केवळ नावालाच उभारल्याचे समोर आले. तसेच अनेक चेकपोस्टवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले. काही ठिकाणी मात्र, चेकपोस्टवर सर्व कर्मचारी उपस्थित असल्याचे तसेच वाहनांची व्यवस्थित तपासणी सुरू असल्याचे आढळले.मालेगाव-पातूर रस्त्यावर वाहनांची तपासणीच नाही!शिर्ला : पातूर तालुक्यात तीन चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. यातील पातूर-मालेगाव रोडवर असलेल्या चेकपोस्टवर एक पोलीस हेड कॉन्स्टेबल, एक गृहरक्षक दलाचा जवान हजर होता. तर एक पोलीस कॉन्स्टेबल गैरहजर आढळून आला. येथे वाहने तपासणी न करताच सोडून देण्यात येत होती. तसेच चेक पोस्टवरील कर्मचाºयांना पिण्यासाठी पाणीही नसल्याचे आढळले. पातूर-बाळापूर रोडवरील आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळ उभारण्यात आलेल्या पोस्टवर एक पोलीस चालक आणि गृहरक्षक दलाचा जवान तैनात आढळून आला. अकोला- पातूर रोडवर दोन गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. पैकी एक जणच हजर होता. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक चौकीवर तीन शिक्षकांची नेमणूक होती; मात्र आज कोणतेही शिक्षक कोणत्याच पोस्टवर उपस्थित नव्हते. कापशी पेट्रोल पंपाजवळ उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कर्मचारी तैनात होते; मात्र वाहनांची आवक-जावक बिनदिक्कत सुरू होती. पातूर तालुक्यातील चेकपोस्टवर तुरळक वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तिन्ही चेकपोस्टवर १२ ते १ दरम्यान शिक्षक गैरहजर आढळून आले.त्याबाबत तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे विचारणा केली असता चेक पोस्टवर शिक्षक तैनात असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात आदेशही करण्यात आला. त्याबाबतचा आढावा नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन यांच्या माध्यमातून घेत असल्याची माहिती तहसीलदार दीपक बाजड यांनी दिली.

दोन चेकपोस्टची जबाबदारी होमगार्ड व शिक्षकांवरसायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील शिंदखेड व कान्हेरी सरप येथे असलेल्या चेकपोस्टची जबाबदारी शिक्षक व होमगार्ड सांभळत आहेत. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. परिणामी फक्त येणाºया-जाणाºया परवानाधारक वाहनांना थांबवून विचारणा करण्यात येते व नोंद घेऊन सोडून देण्यात येते.शिंदखेड येथील चेकपोस्टवर जाऊन चौकशी केली असता तेथे चार शिक्षक व एक होमगार्ड तैनात होता, तर कान्हेरी सरप येथील चेकपोस्टवर जाऊन पाहणी केली असता होमगार्ड व शिक्षक दिसून आले. या दोन्ही मार्गाने मुंबई-पुणे, हैद्राबाद, सुरत गुजरात आदीसह इतर जिल्ह्यातील वाहने येतात. एखादे वाहन जर विनापरवाना जात असेल तर चेकपोस्टवर तैनात शिक्षक व होमगार्ड यांना अधिकारच नसल्याने वाहन सोडून द्यावी लागतात. लॉकडाउनच्या काळातही बार्शीटाकळी-अकोला मार्गावर गौण खनिज वाहतूक सुरू असून, त्याची परवानगी, रॉयल्टी विचारण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकृत कर्मचारी चेकपोस्टवर नसल्याने ही मालवाहू वाहने तशीच जात आहेत. तैनात असलेले कर्मचारी फक्त खुर्चीवर बसून येणाºया-जाणाºया वाहनांची थांबवून विचारपूस करतात व नोंद घेतात. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करण्याºया वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार नसल्याने हे दोन्ही चेकपोस्ट फक्त नावापुरतेच असल्याचे दिसून येते.

शेगाव टी पॉइंटवर प्रत्येक वाहनाची तपासणीबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहेत. तसेच बाळापूर येथील डॉ. मनोरमा व हरिभाऊ पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नोंद घेत आहेत. प्राध्यापकांच्या १७ मेपर्यंतच ड्युटी असताना १८ मे रोजीही ते चेक पोस्टवर दाखल झाले. नगराध्यक्ष सै. ऐनोदीन खतीब बाळापूरकडून खामगावकडे जात असताना त्यांची गाडी अडवून वाहनात असलेल्या प्रवाशांची माहिती घेतली. बाळापूर, खामगाव, शेगाव, लाखनवाडा अशा चारही बाजूकडून येणारे प्रवासी वाहने तपासत असताना खामगावकडून प्रवासी मजूर भरलेले ट्रक भरधाव निघून गेले.

कुरूम चेक पोस्टवर वाहनांची तपासणीच नाही!कुरुम : येथून काही अंतरावर असलेल्या अकोला, अमरावती जिल्ह्याच्या सीमेनजीकच्या हयातपूर चेक पोस्टला १८ मे रोजी भेट दिली असता, वाहनांची तपासणीच करण्यात येत नसल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक वाहने अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रवेश करीत होते. या चेक पोस्टवर एकूण ५ कर्मचाºयांचे पथक कर्तव्यावर होते. यात माना पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाºयांसह मूर्तिजापूर येथील शाळांवर असलेले तीन शिक्षक हजर होते. यादरम्यान वाहनांची वर्दळ सुरू होती. अकोला,अमरावती, वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर १० की.मी.परिसरात तीन चेक पोस्ट असून, हयातपूर चेकपोस्टवरून अमरावती जिल्ह्यातील पेट्रोल पंपजवळ अंदाजे ३ की.मी. १ चेक पोस्ट तर वाशिम जिल्ह्यातील अंदाजे ५ ते ६ कि.मी.वर धनज येथे १ चेक पोस्ट आहे.नेर येथील चेकपोस्ट रामभरोसेतेल्हारा : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नेर येथील चेक पोस्टवरील कारभार राम भरोसे असल्याचा प्रकार १८ मे रोजीच्या दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळला.या नेर चेक पोस्टवरून अकोट व अकोला येथील नागरिक व माल वाहक वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याचे आढळले. प्रशासनाने परवानाधारक व अत्यावश्यक तसेच जीवनाश्यक मालाची ये-जा करणारी वाहने वगळता इतर वाहनांना व नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे; मात्र या चेक पोस्टवर ज्या कर्मचाºयांची ड्युटी लावली आहे ते आपले कर्तव्य बजावताना हलगर्जी करीत असल्याचे दिसून आले. अनेक वाहने न थांबवता सरळ ये-जा करीत असल्याचे आढळले, तसेच स्थानिक पातळीवर याबाबत चौकशी केली असता, चेक पोस्ट आहे; पण कोणी अजूनपर्यंत तरी परत आलेला नाही. यावेळी अनेक वाहने कुठल्याही तपासणीविना जात असल्याचे आढळले.

आसरा, भटोरी, पिंजर म्हैसांग मार्गावर चेकपोस्टच नाही!मूर्तिजापूर /हातगाव : जिल्हा बंदीबरोबरच चेकपोस्ट लावून तालुक्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, यासाठी पाच चेकपोस्ट लावण्यात आले आहे; परंतु लावलेले पाचही चेकपोस्ट नावापुरतेच असून, अनेक गाड्या न तपासता किंवा कुठलीही पास अथवा परवाना नसताना सोडून दिल्या जात असल्याची गंभीर बाब लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उजेडात आली आहे. दरम्यान, तालुक्यातील महत्त्वाच्या सीमा बंद केल्याने इतर जिल्ह्यातील वाहने या मार्गाने तालुक्यात दाखल होत आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मूर्तिजापुरात एक रूग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे तालुक्यातील सर्वच चेकपोस्टवर कडक बंदोबस्त असणे गरजेचे आहे. परंतु अनेक चेकपोस्टला भेटी दिल्या असता, या कामात हलगर्जी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यात कुरुम, बिडगाव, लाखपुरी, गोरेगाव, अनभोरा असे पाच चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षक - प्राध्यापकांचे १६ पथके तयार करण्यात आली असून ५८ कर्मचाºयांना कामाला लावले आहे.चेकपोस्टरवर केवळ चार खांब उभारुन त्यावर हिरवा जाळीदार कापड टाकलेला आहे. चेकपोस्टवर ड्युटी करणाºया कर्मचाºयांना उन, वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. कारंजा मार्गावरील अनेक दिवसांपासून लावलेल्या बिडगाव चेकपोस्टवर पोलिसांची राहुटी वजा तंबू दोन दिवसांपूर्वी सुटलेल्या वादळाने उन्मळून पडला आहे. तिथे उपस्थित असलेले कर्मचारी प्रवासाी निवाºयाचा आधार घेऊन रात्रंदिवस ड्युटी करीत आहेत. संपूर्ण चेकपोस्टवर सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा रात्री थांबण्याची व्यवस्था, रात्री प्रकाशाची व्यवस्था नसल्याने अनेक सुविधांचा अभाव दिसून आला. तर काही ठिकाणी कर्मचारी दांडी मारत असल्याचे आढळून आले.विषेश म्हणजे आसरा, लाखपुरी- शेलूनजीक आणि दर्यापूर - रामतीर्थ (म्हैसांग मार्गे) मूर्तिजापूर मार्ग अमरावती तर पिंजर मार्ग (कारंजा) वाशिम जिल्ह्याला जोडल्या गेले आहेत. या महत्त्वाच्या मार्गांवर कुठेही चेकपोस्ट नसल्याने उपरोक्त जिल्ह्यातून मूर्तिजापूर सहजरीत्या लोक दाखल होत आहेत.तर अनेक चेकपोस्टवर कर्मचारी हलगर्जी करीत असल्याची बाब स्टिंग आॅपरेशन दरम्यान स्पष्ट झाली आहे. काही ठिकाणी कर्मचारी उपस्थित नव्हते. ऐन वेळेवर फोन करून सहकर्मचाºयांनी बोलावून घेतले. ओळखीचे असल्याने इतर जिल्ह्यातून आलेल्या चार चाकी वाहनांना सहीसलामत ‘सीमोल्लंघन’ करून दिले. यामुळे या तालुक्यात आलेले कोरोना संकट अधिकच गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरBalapurबाळापूरTelharaतेल्हाराPaturपातूर