लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटलेल्या बहुतांश हॉटेल्स आणि स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेचे कुठलेच निकष पाळले जात नसून पिण्याच्या पाण्यासाठी लावून असलेल्या टाक्या, वॉटर कुलर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आला.त्या-त्या शहरांमधील नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अधिकृत हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता व आरोग्याशी संबंधित अटींची पुर्तता करण्याच्या अटीवर परवाना दिला जातो; मात्र त्याची पुर्तता बहुसंख्य अधिकृत हॉटेल मालक करित नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यात विनापरवाना ठिकठिकाणी चालणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेल्स आणि स्वीटमार्टमध्ये तर स्वच्छतेचे कुठलेच निकष पाळले जात नसून त्याकडे स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.दुषीत पाणी प्राशनामुळे प्रामुख्याने कावीळ, अतिसार, ताप आदी साथींचे आजार उद्भवतात. असे असताना जिल्ह्यातील सहाही शहरांमध्ये थाटण्यात आलेल्या बहुतांश हॉटेल्स आणि स्वीटमार्टमध्ये पाणी साठवून ठेवल्या जाणाºया टाक्या, स्टीलचे वॉटर कुलर, ग्लास आदिंची कुठल्याच प्रकारे स्वच्छता केली जात नसल्याचे स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आले. या गंभीर प्रकारामुळे नगर परिषद प्रशासन आणि अन्न प्रशासनाने लक्ष पुरवून स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:18 IST
टाक्या, वॉटर कुलर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आला.
Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा!
ठळक मुद्देहॉटेल्स आणि स्वीटमार्टमध्ये तर स्वच्छतेचे कुठलेच निकष पाळले जात नसून त्याकडे स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.दुषीत पाणी प्राशनामुळे प्रामुख्याने कावीळ, अतिसार, ताप आदी साथींचे आजार उद्भवतात.अन्न प्रशासनाने लक्ष पुरवून स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.