शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अजूनही चालतो वाट..

By admin | Updated: September 5, 2014 01:30 IST

अकोल्यातील एक शिक्षक असाही.. वय वर्ष ८२

डॉ. किरण वाघमारे/अकोलामाणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, असे म्हटले जाते; परंतु शिक्षकाचे काय? शिक्षक सेवानवृत्त झाल्यावर त्याचे शिकविणे थांबते. बहुतेक शिक्षक थांबलेले आपल्याला दिसतातरू परंतु अकोल्यातील एका तपस्वी शिक्षकाची वाटचाल अजूनही सुरूच आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी मोरेश्‍वर मोर्शीकर या शिक्षकाचे शिकविण्याचे काम सुरूच आहे. विशेष म्हणजे कुठलीही गुरुदक्षिणा न घेता मोर्शीकर सर आपले काम करीत आहेत. सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांना मोडी लिपीचे धडे देत आहेत. अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील सेवानवृत्त शिक्षक म्हणून मोर्शीकर सरांचा संपूर्ण शहराला परिचय आहे. आज मुख्याध्यापक नाही साधा शिक्षक जरी सेवानवृत्त झाला तरी त्याचा बंगला, दिमतीला चारचाकी गाडी आलीच म्हणून समजा; परंतु मोर्शीकर सरांजवळ यापैकी काहीच नाही. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा शहरातील रस्त्यांवर जातो. सरांची ओळख नसणारे कदाचित त्यांना वेडा या नजरेतून पाहत असतील. हो! सर वेडेच आहेत; परंतु त्यांना वेड आहे आपल्या जवळील ज्ञान वाटण्याचे. सर रस्त्यावरून चालताना सर्वसामान्यांसारखे चालत नाहीत. ते चालणार्‍यांच्या पायाला खडे टोचू नये म्हणून खडे उचलून बाजूला टाकतात, रस्त्यावरील कागद-कचरा गोळा करून बाजूला टाकतात, रस्त्याच्या कड्याला असलेल्या रोपांचे संगोपन करता, मैदानात खेळणार्‍या विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगतात. मोर्शीकर सर शाळेत असतानादेखील कधी केबीनमध्ये बसून रुबाब दाखवित नसत. शाळेतील विद्यार्थ्यांंची सतत काळजी ते घेत असत. वर्गात जाऊन शिक्षकांची तपासणी करीत. त्यांचे चुकले तर त्यांना मार्गदर्शन करीत. तब्बल ४१ वर्ष सरांनी शिक्षक म्हणून काम केले. या काळात आपल्या गरजेपुरता अत्यल्प पैसा बाजूला काढून ते संपूर्ण पगार शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांंसाठी खर्च करीत असत. त्यांचा स्वत:चा असा संसार नव्हता; परंतु ज्ञानेश्‍वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ह्यहे विश्‍वची माझे घरह्ण हा वसा घेत मोर्शीकर सरांनी विश्‍वाचा संसार मांडला. आज शासन मूल्यसंस्कार रुजविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे; परंतु मोर्शीकर सरांनी कुठलिही प्रसिद्धीची साधने उपलब्ध नसताना आपल्या तर्‍हेने मुल्यसंस्कार रुजविले. सेवानवृत्तीनंतर शांत न बसता सरांनी जगाची भाषा असलेल्या इंग्रजीची शिकवणी सुरू केली. एक पैसाही न घेता ज्याला वाटेल त्याने यावे आणि इंग्रजी शिकावे, असा सरांचा क्लास. कुठलीही पाटी न लावता आणि गवगवा न करता आठ दिवसांत निरक्षर व्यक्तीलादेखील इंग्रजी शिकविण्याची किमया मोर्शीकर सरांनी केली. ह्यलर्न इंग्लिश थ्रु टेन्सेसह्ण, ह्यतर्खडकर इंग्रजीचे मराठी भाषांतरह्ण, ह्य२0 दिवसात इंग्रजी बोलणे- वाचणे-लिहिणेह्णआणि ह्यइंग्रजी शिकण्यासाठी २६ सोपे नियमह्ण ही पुस्तेक सरांनी लिहिली. ती मोफत वाटली. सरांची गीतेवर प्रगाढ श्रद्धा. विशेषकरून गीतेतील कर्मवादावर त्यांचा अधिक विश्‍वास. म्हणूनच सर फळाची अपेक्षा न करता कर्म करीत आहेत. वयाच्या ८0 व्या वर्षी सरांनी भगवद्गीतेचे सोपे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे म्हणून मराठी, हिंदी आणि इंग्रजीत गीतेचा अनुवाद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर शालेय विद्यार्थ्यांंपर्यंंत त्यांनी आपली गीता पोहोचविली. श्रीकृष्ण हा ह्यग्रेटह्ण शिक्षक असून त्यांचे स्मरण म्हणजे खरा शिक्षक दिन असे सर मानतात. आज वयाचे ८२ वर्ष पूर्ण करणारे सर मोडी लिपीसाठी झटत आहेत. मोडी लिपीची माहितीपर ५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. महसूल कर्मचार्‍यांना ते मोडी लिपीचे धडे देत आहेत. न थकता मोर्शीकर सरांची वाटचाल अव्याहत सुरू आहे.