शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:05 IST

स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

अकोला : महापालिकेच्या परवानगीशिवाय शहरात फोर-जी केबल टाकणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि नियमांचे उल्लंघन करणाºया स्टरलाइट टेक कंपनीच्या केबलची तपासणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले असता, मनपा प्रशासनाच्या निर्देशाकडे रिलायन्स कंपनीने पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. मनपाच्या तपासणी प्रक्रियेकडे पाठ फिरवणाºया रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी दुपारी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत गुफ्तगू केल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.मागील दोन वर्षाच्या कालावधीपासून शहराच्या विविध भागात फोर-जी केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित मोबाइल कंपन्यांनी शहरात खोदकाम करून केबलचे जाळे टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार होत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. मनपाची २०१८-१९ मध्ये परवानगी न घेताच रिलायन्स कंपनीच्यावतीने काही भागात खोदकाम केल्या जात असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मनपाच्या स्थायी समिती सभागृहात भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी प्रशासनाला विचारणा केली असता, उपायुक्त वैभव आवारे यांनी रिलायन्स कंपनीला अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही शहरात केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचा ऊहापोह झाल्यानंतर प्रशासन कारवाई करीत नसल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांना समोर यावे लागले. त्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स आणि स्टरलाइट कंपनीच्या केबलची खोदकाम करून तपासणीचे निर्देश दिले. आयुक्तांच्या निर्देशांकडे रिलायन्सने पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.कंपन्यांनी मनपाची फसवणूक केल्याचा साजिद खान यांचा आरोपफोर जी केबल टाकण्यासाठी रिलायन्स व स्टरलाइट कंपनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी खोदकाम करीत पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फोडली आणि नियमानुसार काम न करता, मनपाची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे मनपा व नगरसेवकांची बदनामी होत आहे. हे काम सत्ताधारी पक्षाच्या काळात झाले आहे. त्यामुळे आयुक्तांनी याचा खुलासा करावा. अन्यथा विरोधी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सोमवारी दिला आहे.

रिलायन्सच्या अहवालाकडे लक्षमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स आणि स्टरलाइट या दोन्ही कंपन्यांनी शहरात आजवर टाकलेल्या केबलची खोदकाम करून तपासणी करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले होते. खोदकाम करताना दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना उपस्थित राहणे बंधनकारक होते. यादरम्यान केवळ स्टरलाइटचे प्रतिनिधी उपस्थित होते,तशी नोंद प्रशासनाने केली आहे. अर्थात रिलायन्सचे प्रतिनिधी हजर नसल्याने या कंपनीकडून मनपाला कोणता अहवाल दिला जातो, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी भाजप संशयाच्या घेºयातशहरात टाचणी जरी पडली तरी त्याची सविस्तर माहिती सत्ताधारी भाजपकडून ठेवल्या जाते. शहराप्रति अशा कर्तव्याची जाणीव ठेवणाºया सत्ताधारी भाजपाला जलवाहिनींची तोडफोड करणाºया मोबाइल कंपन्यांनी चालवलेला धुडगुस कसा दिसला नाही, यावर सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांच्यावर मनपा प्रशासनाला निर्देश देण्याची वेळ आल्यामुळे सत्ताधारी संशयाच्या घेºयात सापडले आहेत.

मनपाकडून २२ ठिकाणी खोदकाममनपाच्या बांधकाम विभागाने मागील तीन दिवसांच्या कालावधीत स्टरलाइट कंपनीने टाकलेल्या केबलची २२ ठिकाणी खोदकाम करून तपासणी केल्याची माहिती आहे. यादरम्यान काही ठिकाणी आढळून आलेल्या इतर केबल प्रकरणी रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता, त्यांनी सदर केबल त्यांच्या कंपनीचे नसल्याचे सांगितले. तशी नोंद मनपाने केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका