अकोला : सततच्या नापिकीमुळे व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा हवालदिल झालेला असताना, रिझर्व्ह बँकेने भाजप धार्जिणे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. कर्जमाफी जर दिली, तर अशीच घाणेरडी सवय शेतकऱ्यांना लागेल. शेतकरी नवीन सरकार येण्याची वाट पाहत राहतील. कर्जमाफी दिल्यास महाराष्ट्राच्या ताळेबंदाचा समतोल बिघडेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शिवसेनेचा नारा शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे. या बाबीकरिता मदनलाल धिंग्रा चौकात अकोला शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने उर्जित पटेलांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेनेचे सहसंपर्क श्रीरंगदादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख अतुल पवनीकर, तालुका प्रमुख विकास पाटील पागृत, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक मंगेळ काळे, अश्विन नवले, प्रदीप गुरुखुद्दे, सागर भारुका, शशी चोपडे, नकुल ताथोड, योगेश गीते, शरद तुरकर, संजय बांबेरे, भास्कर अंभोरे, गजानन बोराळे, केदार खरे, सुरज सोळंके, रामचंद्र घावट, अभिषेक खडसाळे, अनिल निकामे, इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पुतळा जाळला
By admin | Updated: April 8, 2017 01:45 IST