शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एसटी डेपोसाठी आता ‘ब्रेक डाउन व्हॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 13:08 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रत्येक डेपोसाठी आता ब्रेक डाउन व्हॅन (दुरुस्ती पथक) येत असून, पहिल्या टप्प्यात ५० व्हॅन राज्य शासनाने खरेदी केल्या आहेत.

- संजय खांडेकर

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रत्येक डेपोसाठी आता ब्रेक डाउन व्हॅन (दुरुस्ती पथक) येत असून, पहिल्या टप्प्यात ५० व्हॅन राज्य शासनाने खरेदी केल्या आहेत. प्रवासी गाडी दुरुस्तीसाठी सर्व दृष्टीने सुसज्ज अशा अद्ययावत ब्रेक डाउन व्हॅन राज्यातील निवडक विभागात पोहोचत असून, त्यात अकोला विभागाचा समावेश आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाडीला प्रवासी वाहतूक दरम्यान मार्गात कुठे अपघात झाला तर तातडीने जवळच्या डेपोची चालू स्थितीतील बस तेथे पाठवून परिस्थिती हाताळल्या जाते. नादुरूस्त बसगाडीची दुरुस्ती मार्गात करण्याचा प्रयत्न केला जातो. जर गाडीची दुरुस्ती मार्गात होत नसेल तर टोचण करून अपघातग्रस्त बसगाडी दुरुस्तीसाठी जवळच्या वर्कशॉपमध्ये आणली जाते. सोबतच पर्यायी बसगाडीतून प्रवाशांची वाहतूक नियमित केली जाते. या परंपरागत पद्धतीवर चांगला पर्याय म्हणून यापुढे ब्रेक डाउन व्हॅन महत्त्वाचे कार्य करणार आहे. राज्याच्या मार्ग परिवहन खात्याने यासाठी ५० वाहनांची खरेदी केली असून, पुढच्या टप्प्यात व्हॅनची संख्या अधिक वाढविली जाणार आहे. राज्याने खरेदी केलेल्या ५० व्हॅनपैकी प्रादेशिक पुणे विभागासाठी १०, शहर पुणे विभागासाठी १०, औरंगाबाद विभागासाठी ११, नागपूर विभागासाठी ४, नाशिक विभागासाठी ५, अमरावती विभागासाठी ५ आणि रायगड विभागासाठी ५ ब्रेक डाउन वाहन पाठविल्या जाणार आहेत. टप्प्या-टप्प्याने राज्यातील २५० एसटी डेपोसाठी स्वतंत्र ब्रेक डाउन व्हॅन देण्याचा संकल्प परिवहन खात्याचा आहे.अशी असेल ‘ब्रेक डाउन व्हॅन’अद्ययावत आणि सुसज्ज असणाऱ्या ब्रेक डाउन व्हॅनमध्ये एअर कॉम्प्रेशरपासून तर टूल बॉक्स, स्पेअर पार्ट रॅक, चेन पुली ब्लॉक, जनरेटर, नीमॅटीक गिलीसिरींग अ‍ॅण्ड गन, जॅक, व्हील टूल, ड्रिलींग मशीन, आॅइल पंप, वॉटर टँक, सर्च लाईट आदी व्यवस्था या ब्रेक डाउन व्हॅनमध्ये प्रामुख्याने राहणार आहे. त्यामुळे बहुतांश दुरुस्तीचे काम या व्हॅनद्वारे होणार आहे.- विभागासाठीची व्हॅन लवकरच रायगडहून अकोल्यात दाखल होत आहे. सर्व दृष्टीने सुसज्ज असलेल्या या व्हॅनसाठी एका स्पेशल टीमची ड्युटी लावली जाणार आहे. अपघाती घटनेत ब्रेक डाउन व्हॅन महत्त्वाची कामगिरी पार पाडेल, असे वाटते.- अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा, एसटी विभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ