शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य लॉटरीची गुढीपाडवा सोडत प्रचाराविनाच!

By admin | Updated: March 27, 2017 21:41 IST

विक्रेत्यांची नाराजी; राज्यभरात अध्र्याच तिकिटांची झाली विक्री

अकोला, दि. २७- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणार्‍या लॉटरीच्या विविध सोडतींचा प्रचार व प्रसार माध्यमांसह इतर मार्गाने केला जातो. त्याचा लाभ लॉटरीच्या तिकीट विक्रीसाठी होतो. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीचा प्रचार राज्य सरकारने केला नसल्याने त्याचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वतीने दरवर्षी विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने सोडत काढली जाते. दिवाळी, दसरा, नाताळ, नवीन वर्षासह गुढीपाडवा या सोडतीची तिकीट विक्री दरवर्षी चढत्या क्रमानेच राहिली आहे. या सर्व सोडतीचा प्रचार-प्रसार विविध प्रसारमाध्यमांमधून सतत केला जात असल्याने तिकिटाची विक्री वाढते. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने या सोडतीचा प्रचारच केला नाही. या सोडतीसाठी तब्बल चार लाख तिकिटे छापण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सोमवार दुपारपर्यंत अवघ्या दोन लाख तिकिटांचीच विक्री झाली आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच तिकीट विक्रीचे मुंबई येथील मुख्य एजंट यांनी वित्त सचिवांना प्रचारासंदर्भात स्मरणपत्रही दिले होते; मात्र वित्त विभागाने त्यांची दखल न घेतल्याने तिकिटाची मोठय़ा प्रमाणात विक्री होऊ शकली नाही. याचा तोटा विक्रेत्यांसह राज्य सरकारलाही झाला आहे. या संदर्भात राज्य लॉटरी विक्रीचे एजंट मनीष खेतान यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की पश्‍चिम वर्‍हाडात गुढीपाडवा सोडत लोकप्रिय आहे. तब्बल एक कोटीच्या वर बक्षीस असल्याने अनेक ग्राहक नववर्षानिमित्त तिकिटांची खरेदी करतात. यावर्षी सदर सोडतीचा प्रचारच झाला नसल्याने तिकीट विक्रीला फटका बसला आहे. त्याचा थेट संबंध वित्त विभागाला होणार्‍या उत्पन्नावर होत असल्याने प्रचारासाठी आलेला फंड खर्च न करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी खेतान यांनी केली आहे. दरम्यान, लॉटरीचे आयुक्त पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.