शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात बोंडअळीवर होणार मंथन! राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:20 IST

अकोला : बीटी कपाशीवर बोंडअळीचा वाढता प्रभाव बघता, या विषयावर अकोल्यात मंथन होणार आहे. १0 मार्च रोजी डॉ. पंदेकृविच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर करतील. या चर्चासत्राला कापूस उत्पादक विभागातील सर्व कृषी अधिकार्‍यांची उपस्थिती राहील.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बीटी कपाशीवर बोंडअळीचा वाढता प्रभाव बघता, या विषयावर अकोल्यात मंथन होणार आहे. १0 मार्च रोजी डॉ. पंदेकृविच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर करतील. या चर्चासत्राला कापूस उत्पादक विभागातील सर्व कृषी अधिकार्‍यांची उपस्थिती राहील.राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, विदर्भातील शेकडो शेतकर्‍यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. या अस्मानी, सुलतानी संकटांचा सामना करताना, शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या प्रचंड खचला आहे.राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, विदर्भात १६ लाख ४५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. मराठवाडा १६ लाख ९२ हजार ४१६, खान्देश ७ लाख ८८ हजार १५, तर पश्‍चिम महाराष्ट्रात २३ हजार ११८ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. यावर्षी राज्यात १0 टक्के कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कपाशीचे पीकही जोरदार आले होते. पण अळ्य़ांनी आक्रमण केल्याने हे पीक हातचे गेले. विदर्भात मान्सूनपूर्व कपाशी पेरणी केली जाते. या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पात्या आणि फुले गळती होऊन कपाशीचे प्रचंड नुकसान झाले.या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने या अळीचा सखोल अभ्यास करू न शेतकर्‍यांना त्यांची इंत्थभूत माहिती मिळावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत या विषयावर अकोल्यात राज्यस्तरीय मंथन होणार आहे. या चर्चासत्राला कापूस उत्पादक जिल्हय़ातील सर्व कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकार्‍यांची उपस्थिती राहील.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ