शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन २४ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:55 IST

अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे २४ नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथेसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे २४ नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथेसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय संमलेनात राष्ट्रसंताच्या विचारांचा जागर होणार असूनसंमेलन स्थळाला आद्य किर्तनकार आमले महाराज साहित्य नगरी व दुर्गादास रक्षक सभागृह असे नाव देण्यात आले, अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी दिली.दोन दिवसीय संमेलनानिमित्त रविवारीसुरुवात २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व चिंतनाने होणार आहे, यानंतर श्री गुरुदेव बालभजन मंडळ बेलखेड यांचे खंजेरीभजन यानंतर चंद्रशेखर चतारे व अनिल अडगणे यांच्या संयोजनात सामुदायिक प्रार्थना मंडळाची स्पर्धा पार पडणार आहे. संमेलनाला अध्यक्षम्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. जावेदजी पाशा कुरेशी हे राहणार आहेत. ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांची निवड उद्घाटन सत्रात भजनसम्राट रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ग्रामगिता जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ प्रचारक गजानन चिंचोळकार व सुनील देशमुख यांना देऊन गौरविण्यात येईल. राष्ट्रसंतांचे आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांचे वाचन व सादरीकरण डॉ. राजीव बोरकर यांच्या संयोजनात पार पडेल. या संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. या समारोपीय सत्राला संमेलनाध्यक्ष प्रा. जावेदजी पाशा कुरेशी, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, विशेष उपस्थिती डॉ. रणजित पाटील, आचार्य वेरुळकर गुुरुजी, डॉ. विघे गुरुजी, किर्तनकार महादेव भुईभार, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधिर सावरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, बहुजन पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, धनंजय मिश्रा, अ‍ॅड. संतोष भोरे, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साखरकर, श्रीपाद खेळकर, राजेंद्र झामरे, प्रमोद शेंडे, डॉ. राजीव बोरकर, दिलीप कराळे, शिवा महल्ले, स्वप्निल अहिर, आकाश हरणे, नंदकिशोर डंबाळे, श्रीकृष्ण ठोंबरे, तुषार बरगट आदींसह सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज