शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

केळीवेळीत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:47 IST

27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्‌घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे.

अकोलाकबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळी येथे 27, 28 व 29 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकाराने या वर्षी ही स्पर्धा होत असून त्याला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी 2020 असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती कबड्डी मंडळाचे संयोजक माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांनी दिली आहे. 27 मार्च पासून सुरु होणाऱ्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी अनेक दिग्गज येणार असून त्यामध्ये पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, महिला बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकुर, क्रीडा मंत्री ना. सुनिल केदार व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित सीने कलावंत आपली हजेरी लावणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले. यंदा केळीवेळी कबड्डीचे 78 वे वर्ष असून 1942 साली स्थापन झालेल्या हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेने नुकताच आपला अमृत महोत्सव साजरा केला आहे. यावर्षी राज्यातील विविध भागातून कबड्डीचे खेळाडू केळीवेळीत दाखल होणार आहेत. महिला आणि पुरुष गटात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीच्या विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहे. पुरुष गटात प्रथम विजेत्या संघाला एकाहत्तर हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.  हे बक्षीस सुप्रसिद्ध व्यापारी खरोटे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकाव्वन हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस एकत्तीस हजार रुपये राहणार आहे तर महिला गटात प्रथम बक्षीस एकाव्वन हजार रुपये प्रा. मधुकर पवार यांच्या कडून देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकाचे एकत्तीस हजार रुपयांचे बक्षीस हुसे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून तर तृतीत क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस डॉ. प्रा. मुकुंद खुपसे (पाटील) यांच्याकडून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मॅन ऑफ दी मॅचसह विविध प्रकारचे 50 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत अशी माहिती दाळू गुरुजी यांनी यावेळी दिली. विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावे आ. चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत असून कबड्डी प्रेमी जणांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. केळीवेळी गावाने क्रीडा क्षेत्रात कबड्डीमुळे आपले नावलौकिक केले असून देश गौरवासाठी देश-विदेशात आपले खेळाडू पाठविले आहेत. पाऊन शतकाची ही परंपरा अशीच कायम असून या गावाला अनेकांनी साथ दिली आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर, उद्योजक स्व. राधाकिसन व स्व. अंगुरीदेवी बाजोरिया, मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू स्व. पुंडलीकराव अवचार व स्व. संजय हिवरे (गुरुजी), यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे. दि. 27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्‌घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आ. गोपीकिशन बाजोरिया व माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आ. डॉ. जगन्नाथ ढोणे, मंडळाचे अध्यक्ष गजानन मोंढे, ‌माजी जि.प. सदस्य ज्ञानदेवराव परनाटे, माधवराव बकाल व मंडळाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAkolaअकोला