शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभाग बजावणार वाइन, बीअर शॉप चालकांना नोटीस

By admin | Updated: November 8, 2014 00:15 IST

अकोला शहरातील दारू व बीअर विक्रेत्यांमध्ये खळबळ

अकोला : अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करणे, त्यांच्या हातात दारूच्या बाटलीचे पार्सल देण्यास प्रतिबंध असतानाही शहरातील वाइन शॉप व बीअर शॉपचे चालक, त्यांचे कर्मचारी बिनधास्तपणे दारूची विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार 'लोकमत'ने गुरुवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आला. या स्टिंग ऑपरेशनची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाइन व बीअर शॉप चालकांना नोटीस पाठवून त्यांची विभागीय चौकशी सुरू करणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निर्णयामुळे शहरातील दारू व बीअर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ह्यलोकमतह्ण चमूने शहरातील खुले नाट्यगृहासमोरील वाइन शॉप, टिळक रोड, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी परिसरामध्ये स्टिंग ऑपरेशन केले. यादरम्यान वाइन शॉपमध्ये अल्पवयीन मुलांच्या हातात देशी व विदेशी दारूचे पार्सल देताना दारू विक्रेते आढळून आले. दारूच्या बाटल्यांचे पार्सल आणण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले. दारूच्या पार्सलमुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता बळावू शकते, याचा विचार दारू विक्रेतेही करीत नाही. नियम 'बाटलीत' बुडवून दारू विक्रेते बिनधास्तपणे मुलांजवळ दारू देऊन मोकळे होत असल्याचे स्पष्ट झाले. वाइन बारमध्येसुद्धा लहान मुलांचा दारू आणण्यासाठी व ती पोहोचविण्यासाठी वापर केला जात असल्याचेही समोर आले होते. लोकमतचे स्टिंग ऑपरेशन प्रकाशित झाल्याने शहरातील वाइन बार, वाइन व बीअर शॉप चालक व त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनीसुद्धा स्टिंगची दखल घेत, शहरातील वाइन बार, वाइन व बीअर शॉप चालकांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाइन व बीअर शॉप चालकांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.