शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रणधुमाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:16 IST

जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देऑनलाइन भरावे लागणार अर्ज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (प्रिंट ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे. ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करता येतील. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर गावागावांत सरपंच पदांसाठी आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा!राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात अधिकार्‍यांची बैठक घेऊन, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेत, निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांतता व निर्भेळ वातावरणात पार पाडण्यासाठी गुंड प्रवृत्तीविरुध्द करावयाच्या कारवाईबाबत राज्य निवडणूक आयुक्तांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

८४२ मतदार केंद्र; ७0 निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८४२ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून, ७0 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.